बोरिवली येथे बेस्ट बस आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाल्याने अपघात झाला. या अपघातात बेस्ट आणि ट्रक चालकासह बसमधील तीन प्रवासी जखमी झाले.
दहिसर येथून जुहूला जाणारी बेस्टची २०३ क्रमांकाची बस शुक्रवार सकाळी सात वाजता बोरीवलीच्या कोरा केंद्र येथे आली होती. त्यावेळी समोरून येणाऱ्या एका ट्रकशी तिची जोरदार टक्कर झाली. या अपघातात बेस्ट चालक किरण आचरेकर (२७) आणि ट्रक चालक अय्यपा शेट्टी (२९) जखमी झाले. तर बस मधील धरमदास (६२) या प्रवाशाला मार लागला. बस मधून प्रवास करणारे बस निरीक्षक सानप तसेच प्रवासी असलेले बेस्ट चालक सुर्यवंशी यांनाही किरकोळ दुखापत झाली. या अपघातात बेस्टच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.    

Story img Loader