केंद्र सरकारने डिझेल दरवाढ केल्यामुळे बेस्ट उपक्रमापुढे नवे संकट उभे राहिले आहे आणि प्रवाशांच्या खिशाला भोक पाडून बेस्टने यातून मार्ग काढला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून पहिल्या तीन किलोमीटरसाठी प्रवाशांना जादा एक रुपया मोजावा लागणार आहे.
बेस्टच्या अर्थसंकल्पात बसच्या या भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यास बेस्ट समिती आणि पालिका सभागृहाने संमती दिली. त्यानुसार आता सर्वसाधारण आणि मर्यादित बसगाडय़ांच्या पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी प्रवाशांना पाच रुपयांऐवजी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. मात्र त्यापुढील अंतराच्या भाडय़ात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच वातानुकूलित बसगाडय़ांच्याही केवळ पहिल्या टप्प्याच्या प्रवासासाठी पाच रुपये जादा द्यावे लागणार आहेत.  बस पासमध्येही वाढ करण्यात आली आहे.

Story img Loader