मुंबई : कमी झालेले उत्पन्न आणि वाढलेला खर्च, तिजोरीतील खडखडाट, दैनंदिन खर्च भागवताना करावी लागणारी तारेवरची कसरत आणि कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देण्यासाठी करावी लागणारी धावपळ अशी विचित्र अवस्था बेस्ट उपक्रमाची झाली आहे. एकूणच आर्थिक गणित बिघडल्याने बेस्ट उपक्रमाने स्वमालकीऐवजी भाडेतत्वावर बसगाड्या घेण्याचा सपाटा लावला आहे. देखभाल, दुरुस्तीअभावी अधूनमधून बंद पडणाऱ्या भाडेतत्वावरील बसगाड्या, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आदोलन आदी विविध कारणांमुळे प्रवाशांना फटका बसत आहे. तर दुसरीकडे बेस्ट उपक्रमाला भाडेतत्वावरील बसगाड्यांमुळे संकटांना सामोरे जावे लागत आहे. भविष्यात बेस्ट आणि प्रवाशांसाठी भाडेतत्त्वावरील बस धोक्याची घंटा ठरण्याची चिन्हे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा हळूहळू कमी झाला असून भाडेतत्त्वावरील बसची संख्या वाढत आहे. बेस्ट बस व्यवस्थेच्या खासगीकरणामुळे कायम स्वरुपी कर्मचारी आणि प्रवासी मेटाकुटीला आला आहे. भाडेतत्त्वावरील बसचे कामगार कमी पगारात काम करतात. तसेच या बसची देखभाल-दुरुस्ती होत नसल्याने, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करून प्रवास करावा लागतो. बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा कमी होत असल्याने अनेक मार्ग बंद झाले आहेत. भाडेतत्वावरील अनेक बसगाड्यांची दुरूस्तीच होत नसल्याने वातानुकूलित यंत्रणा अधूनमधून बंद पडत आहे. अचानक बस ब्रेक डाऊन होणे अशा घटनाही घडता आहेत.

हेही वाचा >>> क्लीन अप मार्शलकडून अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; पालिकेच्या तिजोरीत आठ महिन्यांत ३४ कोटी १९ लाख रुपये जमा

 ‘ऑलेक्ट्रा’कडून मिळालेल्या माहितीनुसार, विद्युत बसगाड्यांना आंतरराष्ट्रीय मानके लागू आहेत. त्यामुळे या बसगाड्यांचा ब्रेक फेल होऊ शकत नाही. अपघातग्रस्त बसची परिवहन विभागात ऑगस्ट २०२४ नोंदणी झाली. त्यामुळे तीन महिन्यात बसचा ब्रेक फेल होणे शक्य नाही. विद्युत बसगाड्या या डिझेल बसगाड्यांच्या तुलनेत चांगल्या आहेत. त्यामुळे बसमुळे अपघात झाला नसल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास येत आहे.

हेही वाचा >>> बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन

कंत्राटी कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सुमारे ३० टक्के बस स्वमालकीच्या आणि उर्वरित बस भाडेतत्त्वावरील आहेत. बेस्ट उपक्रमातील खासगी बस पुरवठा कंत्राटदारांकडे कंत्राटी पद्धतीने चालक, वाहक आणि इतर कर्मचारी काम करीत असून तेच या बसगाड्यांवर कार्यरत असतात. परंतु, अवेळी वेतन मिळणे, वेतनवाढ न होणे, साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त अन्य सुट्ट्या नसणे आदी प्रश्नांमुळे हे कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे मुलांचे शिक्षण, घरखर्च, कुटुंबियांचा आरोग्य खर्च व महत्त्वाच्या गरजा पूर्ण होत नाही. परिणामी, कंत्राटी कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी अधूनमधून आंदोलन करीत आहेत. त्यामुळे अनेक कर्मचारी विश्रांंती न घेता अतिरिक्त काम करीत असल्याचने त्याचा थेट परिणाम कामावर होत असल्याने अपघात घडत आहेत, असा दावा करण्यात येत आहे.

प्रशिक्षित चालकांची नेमणूक आवश्यक

बेस्ट उपक्रमातील स्वमालकीच्या बसवर चालकची नेमणूक करताना त्याला योग्य प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, कंत्राटदाराने नेमलेल्या बस चालकाला हे प्रशिक्षण मिळत नसल्याचे कामगार संघटनेकडून सांगण्यात आले. मुंबईतील वर्दळीच्या रस्त्यावर बस चालवताना अडचण येते. त्यातूनच अपघाताचे प्रमाण वाढत आहे. चालकांना विद्युत, डिझेल बस, १२ मीटर बस, मिडी बस या सर्व प्रकारच्या बसचे प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यामुळे याप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार कंत्राटदारावर कडक कारवाई करावी, अशी मागणी कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.