लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत विशेष बसफेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत १५ ते २० मिनिटांच्या वारंवारतेने बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहे.

Mumbaikars await cold weather
मुंबईकरांना थंडीची प्रतीक्षा
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Construction of elevated deck at Khar Road of Western Railway
पश्चिम रेल्वेच्या खार रोड येथे ‘एलिव्हेटेड डेक’ची उभारणी
Bogus applications in fruit crop insurance scheme
फळपीक विमा योजनेतही बोगस अर्जांचा सुळसुळाट; जाणून घ्या, सर्वांधिक बोगस अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आले
Tight police security for swearing-in ceremony of Mahayuti government
महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त
Opportunities in the field of radiation research at Mumbai University
मुंबई विद्यापीठात किरणोत्सर्ग संशोधन क्षेत्रात संधी!
Rabi sowing in the country is on 428 lakh hectares
देशातील रब्बी पेरण्या ४२८ लाख हेक्टरवर; जाणून घ्या, देशभरातील पीकनिहाय पेरणी क्षेत्र

बेस्ट उपक्रमाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सेवा पुरविण्यात येणार आहेत. बेस्ट उपक्रमाने ४ ते ७ डिसेंबर या कालावधीत दररोज १५ ते २० मिनिटांच्या अंतराने दादर रेल्वे स्थानकावरून चैत्यभूमीवर जाण्यासाठी बससेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मुंबईच्या विविध भागामधून ४ डिसेंबर रोजी चैत्यभूमीसाठी बसमार्ग क्रमांक २४१, २००, ए-३५१, ३५४ वर बससेवा प्रवर्तित करण्यात येणार आहेत. ६ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, दादर येथून बसमार्ग क्रमांक सी-३३, ए१६४, २४१, सी ३०५, ए ३५१, ३५४, ए-३५७, ए ३८५, सी-४४०, सी ५२१ या बसमार्गावर अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहेत. जेणेकरून, नियमित प्रवासभाड्यात प्रवाशांना चैत्यभूमी येथे पोहचणे सहज शक्य होईल.

आणखी वाचा-अनुयायांच्या विश्रांतीसाठी रेल्वे स्थानकात सुविधा, एकाचवेळी १० हजार अनुयायी थांबण्याची व्यवस्था

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दैनंदिन बसपास ६० रुपये शुल्कात उपलब्ध करण्यात येणार आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीसह मुंबईतील विविध ठिकाणी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस्थळांना भेट देऊ इच्छिणाऱ्या अनुयायांसाठी विशेष बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानापासून सुरू होणारी बसफेरी पुन्हा उद्यानापर्यंत सहा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. सकाळी ७.३०, सकाळी ८, सकाळी ८.३०, सकाळी ८, सकाळी ९, सकाळी १० या वेळेत फेऱ्या उपलब्ध असतील. याशिवाय विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी, तसेच अनुयायांच्या मार्गदर्शनासाठी चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, वीर कोतवाल उद्यान (प्लाझा) परिसरामध्ये बसवाहक / बसनिरीक्षक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय विभागामार्फत अनुयायांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी, औषधोपचार आणि प्रथमोपचार आदींची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.