नव्या संगणकीय डय़ुटी पद्धतीविरोधात वाहक व चालक यांनी केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासनाला नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसावे लागले. या संपामुळे तब्बल ४० लाख प्रवाशांना फटका बसला. साडेतीन हजार बसगाडय़ांपैकी सकाळी फक्त आठ आणि दुपारी फक्त दोन बसगाडय़ा रस्त्यांवर आल्या.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ४२९० गाडय़ा आहेत. त्यापैकी साडेतीन हजारांहून अधिक गाडय़ा रोज रस्त्यावर असतात़ यासाठी बेस्टचे १३०६० चालक आणि १३५०८ वाहक कार्यरत असतात. दर दिवशी तिकीट विक्रीतून बेस्टला सरासरी ३ कोटी ६५ लाख ६० हजार एवढे उत्पन्न मिळते, तर प्रतिबस दर दिवशी ९८३१ रुपयांचे उत्पन्न मिळते. या साडेतीन हजार बसगाडय़ा रस्त्यांवर धावण्यासाठी दर दिवशीचा इंधन खर्च एक कोटीपेक्षा जास्त आहे.
मंगळवारी झालेल्या या संपामुळे एक कोटी रुपयांचा इंधन खर्च वाचला असला, तरी प्रवासी उत्पन्न सपशेल बुडाले. त्यातच बेस्टच्या एका बसगाडीवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केल्याने बेस्टच्या गाडीचेही नुकसान झाले.
संपामुळे बेस्टचे साडेतीन कोटींचे नुकसान
नव्या संगणकीय डय़ुटी पद्धतीविरोधात वाहक व चालक यांनी केलेल्या संपामुळे बेस्ट प्रशासनाला नव्या आर्थिक वर्षांच्या पहिल्याच दिवशी साडेतीन कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान सोसावे लागले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 02-04-2014 at 02:34 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best loss rs 3 and half crore due to strike