११ हजार रुपये रोख स्वरूपात; नोटांची बंडले, नाणी मोजताना कर्मचाऱ्यांची दमछाक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इंद्रायणी नार्वेकर

बेस्टकडे जमा पाच व दहा रुपयांची नाणी आणि १०० च्या आतील मूल्यांच्या नोटांचा यक्षप्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने फेब्रुवारी महिन्याच्या पगारातील तब्बल ११ हजाराची रक्कम कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात देण्याचे ठरवले आहे. पण यामुळे नोटांची बंडले आणि नाण्यांच्या पिशव्या देताना आणि घेताना कर्मचाऱ्यांच्या अक्षरश: नाकी नऊ आले. हा ‘अवजड’ पगार घरी नेण्यासाठी कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली.

बेस्टचे किमान तिकीट पाच रुपये केल्यामुळे बेस्टच्या प्रवाशांची संख्या वाढलेली असली तरी बेस्टकडे एक, पाच व दहा रुपयांची नाणी तसेच दहा व वीस रुपयांच्या नोटा मोठय़ा संख्येने आधीच साठलेले आहेत. या नाण्यांचे करायचे काय, असा प्रश्न बेस्ट प्रशासनाला पडला आहे. गेल्या एक दीड वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगारात पाचशे रुपये मूल्यांची नाणी रोख दिली जात होती. मात्र आता बेस्टच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. बेस्टकडे रोज जमा होणारी नाणी आणि १०० रुपयांच्या आतील मूल्यांचा नोटांचा आता खच जमा होऊ लागला आहे. ही नाणी व नोटा बॅंक घेत नसल्यामुळे हा ‘डेड स्टॉक’ आगारात पडून आहे. अक्षरश गोण्यांमध्ये हे पैसे भरून ठेवले आहेत. हे पैसे कर्मचाऱ्यांना पगाराच्या स्वरूपात रोखीने देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसे परिपत्रक प्रशासनाने काढले असून हा पगार देण्यास बेस्टने शुक्रवारपासून सुरुवात केली आहे.

ज्यांचे निव्वळ वेतन ११ हजाराच्या वर आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना तब्बल ११ हजार रुपये रोखीने देण्यात येणार आहेत. तर उर्वरित पगार बॅंकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. १० हजार रुपये हे वीस, पन्नास, दहा रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात व १००० रुपये हे नाण्यांच्या स्वरूपात दिले जाणार आहेत. १३ मार्चपासून पगार देण्यास सुरुवात झाली असून ३० मार्चपर्यंत ही पगार देण्याची प्रक्रिया चालणार आहे. अधिकारी वर्ग कर्मचाऱ्यांना पगार मोजून देण्याच्या कामाला लागला आहे. तर कर्मचाऱ्यांना जागेवरच पगार मोजून घेण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे बेस्टच्या सर्व आगारात स्वतचा पगार घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची अक्षरश झुंबड उडाली आहे.

हा अवजड पगार घरी नेताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ आले. काखेला लावलेल्या पर्सपेक्षा हा पगार जड असल्याची भावना महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. तर ट्रेनमधून गर्दीतून ही रक्कम नेणे किती धोकादायक आहे, असा सवाल काही कर्मचाऱ्यांनी केला.  हा पगार आम्ही तरी कसा वापरायचा, असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांनी विचारला आहे. तर ही रक्कम जवळ बाळगून डय़ुटीवर कसे जायचे, असा सवाल कंडक्टर आणि ड्रायव्हर यांना पडला आहे.

बँकेशी करार रद्द झाल्याचे परिणाम

बेस्टकडे तिकिटांद्वारे आणि विजेच्या बिलांद्वारे येणारी ही नाणी आणि रोख रक्कम हाताळण्यासाठी बेस्टने दहा वर्षांपूर्वी आयसीआयसीआय बॅंकेबरोबर करार केला होता. मोठय़ा प्रमाणात येणारी ही रक्कम हाताळणे शक्य नसल्याचे कारण देत बॅंकेने हा करार संपुष्टात आणला आहे. त्यामुळे बेस्टच्या परिवहन आणि विद्युतपुरवठा विभागात दररोज जमा होणारी ही चार कोटींची रक्कम करायची काय, असा प्रष्टद्धr(२२४)न बेस्ट प्रशासनाला पडला आहे.