‘बेस्ट’च्या परिवहन विभागाला असलेला आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी प्रशासनाने एक नामी शक्कल लढवली आहे. मुंबईभर असलेल्या बेस्टच्या २६ आगारांच्या जमिनीचा वापर दिवसा पार्किंगसाठी करून बेस्ट प्रशासन अतिरिक्त महसूल गोळा करण्याच्या विचारात आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला असून समितीची मंजुरी मिळाल्यानंतर ही जागा खासगी वाहनांना पार्किंगसाठी उपलब्ध होऊ शकणार आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत बेस्टची २६ आगारे आहेत. या आगारांमधील बहुतांश बसगाडय़ा दिवसभर मुंबईच्या रस्त्यांवर धावत असतात. अशा वेळी आगारातील मोकळ्या जागेचा वापर करून उत्पन्न मिळवण्यासाठी बेस्ट प्रशासनाने ही योजना आखली आहे. या आगारांमधील जागा खासगी वाहनांना
बेस्टच्या बसगाडय़ा किमान १२ तास रस्त्यावर असल्याने आगारातील पार्किंग व्यवस्था १२ तासांसाठी असेल. त्यासाठी ठरवून दिलेल्या गाडय़ांनाच आगारात पार्किंगसाठी प्रवेश दिला जाईल. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अडचण येणार नाही. आगारातील पार्किंगसाठीचे दरपत्रकही ठरवून देण्यात आले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा