बेस्ट उपक्रमाने गेल्या वर्षी दिवाळीनिमित्त जाहीर केलेले सानुग्रह अनुदान कर्मचाऱ्यांना लवकर मिळावे यासाठी बेस्ट समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाशी चर्चा सुरू केली आहे.
दिवाळीत ही रक्कम देण्यास आर्थिक संकटाचे कारण पुढे कारण करून बेस्ट प्रशासनाने नकार दिला होता. त्यासाठी महापौर सुनील प्रभू यांनीही मध्यस्थी केली होती. मात्र तरीही बेस्ट कर्मचाऱ्यांना पैसे मिळालेच नाहीत. बेस्ट समितीच्या मंगळवारच्या बैठकीमध्ये शिवसेनेच सुहास सामंत यांनी हा मुद्दा मांडला. मात्र या प्रश्नात आपण लक्ष घातले असून महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी चर्चा करीत आहोत. त्यामुळे हरकतीचा मुद्दा मागे घ्यावा, असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष नाना उर्फ संजय आंबोले यांनी केले. अध्यक्ष मध्यस्थी करीत असल्यामुळे अखेर सुहास सामंत यांनी हरकतीचा मुद्दा मागे घेतला.

Story img Loader