मुंबईतील रस्ते मार्गावरील प्रवाशांची जीवनवाहिनी अशी बेस्ट बसची ओळख बनली आहे. मुंबईच्या पूर्व – पश्चिम उपनगरांना आणि घरांपासून काही अंतरावर बेस्ट सेवा जोडली गेल्याने, स्वस्त आणि वेगवान सेवा असल्याने बेस्टमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, अनेक प्रवासी तिकिटांचे ५ ते २५ रुपये वाचविण्यासाठी तिकीट काढत नाही. त्यामुळे त्यांना ६६ रुपये ते २०० रुपयांपर्यंत दंड भरावा लागला आहे. गेल्या तीन महिन्यांत बेस्टमधील ६४ हजारांहून अधिक विनातिकीट प्रवाशांना पकडून ४० लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> अरुप पटनाईक ओडिशातून पुन्हा निवडणूक रिंगणात!

Mumbai to Kudal, tough journey,
मुंबई ते कुडाळ २० तासांचा खडतर प्रवास
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
fishermen demand government to approve diesel quota soon
हजारो मच्छीमारांना नव्या हंगामात डिझेल कोट्याची प्रतीक्षा; अनुदानास मंजुरी नसल्याने मच्छीमारांना आर्थिक भुर्दंड
Mahavitaran electricity customers increased adding 74 thousand new electricity connection in two years
महावितरणचे वीज ग्राहक वाढले, दोन वर्षात ७४ हजार नवीन वीज जोडण्या
thane passengers suffer financial loss
एसटी अचानक रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड, संपाचा परिणाम प्रवाशांच्या पथ्यावर
vinesh phogat reader comment
लोकमानस: डोळसपणे गुंतवणूक करणारे किती?
Purchase of mephedrone by courier by 119 highly educated youth
पुणे : कुरिअरद्वारे ११९ उच्चशिक्षित तरुणांकडून मेफेड्रोनची खरेदी
Bag lost in Mumbai suburban train journey handed over to owner Mumbai
प्रवाशाच्या सतर्कतेमुळे पाच लाख रुपयांची रक्कम मालकाकडे सुपूर्त

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात सध्या २ हजार ९१६ बस असून यामधून दररोज ३३ ते ३४ लाख प्रवासी प्रवास करतात. बस प्रवाशांची संख्या वाढत असताना, या गर्दीतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असून उत्पन्नात घट होत असल्याचे बेस्ट उपक्रमाच्या निदर्शनास आले. त्यामुळे जानेवारी २०२४ पासून बेस्ट उपक्रमाच्या बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरूद्ध बेस्ट उपक्रमाने विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. याअंतर्गत बेस्ट उपक्रमाने मुंबईच्या गर्दीच्या बसस्थानकांंवर अतिरिक्त तिकीट निरीक्षकांची नेमणूक केली. या पथकामध्ये एकूण ३८२ निरीक्षकांची तिकीट तपासणीसाठी मुंबईच्या वेगवेगळ्या गर्दीच्या ठिकाणी नेमणूक केली. त्याद्वारे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत ६४ हजार ५९४ विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून ३९ लाख ५१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा >>> उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ठोस धोरणाचा अभाव

बेस्टचे वातानुकूलित प्रवासाचे किमान तिकीट दर ६ रुपये ते कमाल २५ रुपये आहे. तर, विनावातानुकूलित बसचे किमान तिकीट दर ५ रुपये आणि कमाल २० रुपये आहे. मात्र तरीही अनेक प्रवासी वाहक नसल्याचे पाहून, बिनधास्तपणे विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांना रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने तिकीट तपासणी पथक तयार केली. सध्या बेस्ट उपक्रमाकडून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून देय असलेले प्रवास भाडे, अधिक प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट एवढी रक्कम दंड म्हणून आकारण्यात येते. दंड भरण्याचे नाकारल्यास मुंबई महानगरपालिका अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाते, अशी माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली.

महिना – विनातिकीट प्रवासी – दंडवसुली

जानेवारी – २५,०७९ – १५.४० लाख रुपये

फेब्रुवारी – २१,२४७ – १२.९८ लाख रुपये मार्च – १८,२६८ – ११.१३ लाख रुपये