राज्य सरकारने मुंबई वगळता संपूर्ण राज्यभरातील वीजदरांत २० टक्के सवलत देण्याची घोषणा केली असली, तरी मुंबईत मात्र अशी कोणतीही सवलत तुर्तास तरी लागू होणार नाही, असे बेस्ट समितीच्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मुंबईतील वीज ग्राहकांना आधीच सवलतीच्या दरातच वीज पुरवठा करण्यात येतो. मात्र तरीही राज्य सरकारला यात अधिक कपात करायची असेल, तर आधी अनुदानाची रक्कम ‘बेस्ट’च्या तिजोरीत जमा झाल्यानंतरच वीजदरात कपात करण्यात येईल, असा पवित्रा समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या ‘बेस्ट’ ० ते १०० युनिटसाठी ३.३८ रुपये घेते. तर १००-३०० युनिटसाठी ६.२६ रुपये आकारले जातात. ‘बेस्ट’च्या दरांत परिवहन विभागाची तुट भरून काढण्यासाठीच्या अधिभाराचाही समावेश आहे. अधिभार संपल्यानंतर ‘बेस्ट’चे वीज दर आणखी कमी होतील,असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Story img Loader