मुंबई : शिवडी ते न्हावाशेवा सागरी सेतू अर्थात ‘अटल सेतू’वरून गुरुवारपासून बेस्ट बस धावणार आहे. वल्र्ड ट्रेड सेंटर आणि कोकण भवन यांना जोडणारी नवीन वातानुकूलित प्रीमियम बस सेवा, बस मार्ग क्रमांक एस-१४५ सुरू होणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या बेस्ट प्रवाशांना फायदेशीर ठरणार आहे.

मुंबादेवी, महालक्ष्मी मंदिर परिसर विकासासाठी २८० कोटी; जगन्नाथ शंकरशेट स्मारकासाठी ३५ कोटी ; मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा

traffic system in Swargate area will changed on Tuesday November 19 and Wednesday November 20 pune
स्वारगेट भागात दोन दिवस वाहतूक बदल, मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी पीएमपी बस
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Assembly Election 2024 Extra Rounds of Best Bus on Polling Day Low floor deck buses will run for disabled elderly voters
मतदानाच्या दिवशी बेस्ट बसच्या जादा फेऱ्या; दिव्यांग, वृद्ध मतदारांसाठी ‘लो फ्लोअर डेक’ बस धावणार
local train block jogeshwari to Goregaon
मुंबई : जोगेश्वरी – गोरेगाव दरम्यान ब्लॉक, राम मंदिर स्थानकात लोकल थांबणार नाही
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव
expansion of air india service after merger of vistara
विस्तारा’च्या विलीनीकरणातून एअर इंडियाच्या सेवेत विस्तार; विमानांचा ताफा ३०० वर, तर साप्ताहिक उड्डाणे ८,५०० वर

बेस्टची सेवा अटल सेतूवरून सुरू करावी, अशी प्रवाशांची मागणी होती. ती बेस्ट प्रशासनाने मान्य केली. त्यानुसार गुरुवारपासून ही प्रीमियम बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार ते शनिवारदरम्यान ही सेवा सुरू असणार आहे. दैनंदिन प्रवाशांना वाहतुकीसाठी नवा पर्याय तयार झाला आहे. वल्र्ड ट्रेड सेंटर, यशवंतराव चव्हाण सेंटर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (जीपीओ)सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ही बस जोडली गेली आहे. या मार्गावर सुरुवातीला दोन वातानुकूलित बस चालवण्यात येतील. ज्यामुळे प्रवाशांना आरामदायी आणि वातानुकूलित सेवा मिळेल. सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळी या फेऱ्या असल्याने इतर वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी होईल, असे बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने सांगितले.

कोठून कुठपर्यंत?

कोकण भवन, सीबीडी बेलापूर येथून सकाळी ७.३०, सकाळी ८ वाजता आणि वल्र्ड ट्रेड सेंटर येथून सायंकाळी ५.३० वाजता तसेच सायंकाळी ६ वाजता बस फेऱ्या धावतील.

असे असेल भाडे

वल्र्ड ट्रेड सेंटर ते कोकण भवन, सीबीडी बेलापूर प्रवासी भाडे २२५ रुपये असेल. या बसचे किमान भाडे ५० रुपये आणि कमाल भाडे २२५ रुपये असेल. कोकण भवन ते सीएसएमटी (जीपीओ) २०० रुपये भाडे असेल.

अ‍ॅपवरून आरक्षणाची सोय

प्रीमियम बस सेवेचे उद्दिष्ट दोन व्यावसायिक केंद्रामधील अंतर १०० मिनिटांत पार केले जाईल. प्रीमियम बस सेवा अ‍ॅपवरून आरक्षित करून प्रवास करता येईल.