वाशी आगार ते जागतिक व्यापार केंद्रापर्यंत बस क्रमांक ‘सी-५०’ आणि शिवाजी नगर ते मंत्रालयापर्यंत बस क्रमांक ‘सी-८’ या दोन जलद बस शनिवारपासून पूर्व मुक्त मार्गावरुन सुरू करण्यात आल्या. वाशी आगार येथून सकाळी ८.३० आणि ९ वाजता, तर मंत्रालय येथून सायंकाळी ५.३० आणि ६ वाजता परतीच्या प्रवासासाठी या बस उपलब्ध होतील. मात्र ही बस सेवा सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या हस्ते या बस शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी एम-पूर्व प्रभाग समितीचे अध्यक्ष अरुण कांबळे, नगरसेवक विठ्ठल खरटमोल, नगरसेविका उषा कांबळे आदी उपस्थित होते.

Story img Loader