भंडारा जिल्ह्य़ातील लाखणी तालुक्यातील मुरमाडी गावातील एकाच घरातील तीन मुलींवर झालेल्या बलात्कार व हत्याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मृत मुलींच्या आईला विशेष बाब म्हणून राज्य सरकारतर्फे १० लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे.
तीन अल्पवयीन बहिणींवर बलात्कार करून त्यांना ठार मारण्याच्या घटनेने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे सारे समाजजीवन ढवळून निघाले आहे. ही अत्यंत निंदनीय व क्लेशकारक घटना आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालकांना (कायदा व सुव्यवस्था) घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्याचबरोबर या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पोलीस निरीक्षकास निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

केंद्राने अहवाल मागविला
नवी दिल्ली : भंडारा बलात्कार व हत्या प्रकरणाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना भंडारा घटनेचा अहवाल पाठविण्यास सांगितले आहे.

राष्ट्रीय मानव हक्क आयोगाकडूनही दखल
राष्ट्रीय मानव हक्क आयोगानेही याप्रकरणी गुरुवारी महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली. याप्रकरणी चार आठवडय़ांत अहवाल द्या, असे आदेश आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत. ‘बळी गेलेल्या मुली अत्यंत गरीब घरातील असून त्यांच्या बेपत्ता होण्याची दखल पोलिसांनी सुरुवातीला घेतली नसल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. तसेच ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर या मुलींच्या मृतदेहाचे पंचनामे करण्यात आले,’ असे आयोगाने निवेदनात म्हटले आहे.

पालकवर्ग दहशतीत
या घटनेमुळे भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ातील पालकवर्ग प्रचंड दहशतीत आहे. विशेषत: शेतावर कामावर जाणाऱ्या पालकांना शाळेत गेलेल्या मुली घरी सुरक्षित येईपर्यंत घोर लागलेला असतो. घटनेच्या दिवशी मुलींनी एका दुकानातून चॉकलेट खरेदी केले. परंतु, त्या वेळी दोघीच होत्या. तिसरी मुलगी दुकानात आली नव्हती, अशीही माहिती मिळाली. या मुलींजवळ शंभरची नोट राहायची, असेही दुकानदाराने सांगितले. कुटुंबीयांवरच झालेले आरोप आणि अद्यापही हाती न लागलेले धागेदोरे यांनी पोलिसांवर प्रचंड दबाव आला असून एकूण २० पथके रात्रंदिवस आरोपींच्या माग काढण्यात व्यस्त आहेत. दहा पथकांना गुन्ह्य़ाचे वेगवेगळे पैलू तपासण्याच्या कामात जुंपण्यात आले आहे. त्यांनाही दिशा सापडलेली नाही.