मुंबई : भारतरत्न ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना सोमवारी पंडित ह्रदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना लतादीदींच्या आठवणी विशद करताना आशाताई भावूक झाल्या, तर हाजी अली येथे लता मंगेशकर यांचे ४० फुटांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केली.मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या पुण्यतिथिनिमित्त मंगेशकर प्रतिष्ठानद्वारे प्रदान करण्यात आलेल्या सर्व पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह आणि एक लाख एक हजार एक रोख रुपये असे होते.

कला, संगीत, समाजसेवा, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षी भारतीय संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल पंकज उधास यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाटय़निर्मितीचा पुरस्कार ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या गौरी थिएटर्स या संस्थेला, समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवेसाठी श्री सदगुरु सेवा ट्रस्ट, साहित्य क्षेत्रासाठी ग्रंथाली प्रकाशनाला वागविलासिनी पुरस्कार, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रसाद ओक आणि चित्रपट क्षेत्रासाठी विद्या बालन या सर्व मान्यवरांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Video viral grandmothers dance performed on Pahun Jevla Kay song which famous for gautami patil lavani
“पाव्हणं जेवला का?” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून म्हणाल “अशी पिढी पुन्हा होणे नाही”
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Padmashri Physicist Dr Rohini Godbole Memoirs by Researcher Dr Radhika Vinze
विज्ञानव्रती

यावेळी पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांचा सन्मान करण्यात आला. राजबाग, लोणी येथे विश्वनाथ कराड यांनी विश्वशांती कला अकादमी स्थापन केली. या अकादमीचे अध्यक्षपद गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सांभाळले होते. लता मंगेशकर यांच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी कराड यांनी उत्तराखंड येथे सरस्वती नदीच्या उगमस्थानी सरस्वतीचे मंदिर बांधून मूर्तीसमोर लता मंगेशकर यांचा पुतळा उभारला होता. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित केलेल्या या सोहळय़ाला कला, संगीत अशा विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. शास्त्रीय गायक राहुल देशपांडे व गायक हरिहरन यांच्या गायनाची आणि आसाम येथील नृत्य कलाकारांचे कथ्थक नृत्य पाहण्याची पर्वणी रसिकांना मिळाली.