नगरविकास मंत्री भास्कर जाधव यांच्या अडचणी आता अधिकच वाढू लागल्या आहेत. त्यांच्या मुलांच्या लग्नात शाही मंडप उभारणाऱ्या मुंबईतल्या कंत्राटदारांवर सेवाकर विभागाने छापे घातले आहेत.
   डीजी डेकोरेटर्सच्या विविध सात ठिकाणी छापे घालून तपासणी करण्यात आली. त्यांनी सेवा कर भरला आहे की नाही त्याची माहिती तपासली जाणार असल्याची माहिती सेवा कर विभागातल्या सुत्रांनी दिली आहे. याशिवाय ज्यांनी लग्नात फुले पुरविली तसेच ज्यांनी हेलिपॅड बांधले त्यांनी सुद्धा सेवाकर भरला आहे की नाही, त्याचीही चौकशी केली जाणार आहे. जाधव यांच्या मुलांच्या चिपळूण येथील लग्नात एकूण २२ हेलिपॅड बांधण्यात आले होते. यापुर्वी आयकर विभागाने जाधव यांच्या घरावर छापे घातले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav more in trouble