विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वाचारा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल, तर ते योग्यच आहे, अशी भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

भास्कर जाधव विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. तरुणांच्या हाताला काही लागणार नाही. महिलांना न्याय दिला जाणार नाही. लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. पाशवी बहुमताच्या अहंकारातून हे कामकाज चालवलं जाईल,” अशी टीका भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.

Sanjay Raut Criticizes Ajit Pawar From Sharad Pawar Mps
Sanjay Raut: ‘फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे’, शरद पवार गटाचे खासदार अजित पवारांची साथ देणार? संजय राऊत संतापले
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
ajit pawar meet sharad pawar
अजितदादा सहकुटुंब पवारांच्या भेटीला, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी नेत्यांची गर्दी
local body government
राज्यात पुन्हा योजना, उद्घाटनांचा धडाका
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
massive agitation organised against mla bhaskar jadhav in vikas jadhav attack case
हल्ल्याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विकास जाधव आक्रमक, आमदार भास्कर जाधवांविरोधात विराट मोर्च्याचे आयोजन
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

गेल्या अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर डोक टेकवून मी पुन्हा या सभागृहात येणार नाही, असं सांगितलं होतं, असा प्रश्न विचारल्यावर भास्कर जाधव म्हणाले, “असं काही नाही, गैरसमज आहे तो. प्रत्येक अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, पायऱ्यांना नमस्कार करून सभागृहात जातो. आजही आमचे सदस्य पायऱ्यांवर आंदोलन करत होते. पण, आल्यावर पायऱ्यांना नमस्कार केला आणि सभागृहात गेलो. नंतर आंदोलनात सामील झालो. त्याच पद्धतीने सभागृहातील कामकाज संपल्यावर जाताना लोकशाहीच्या मंदिराला नमस्कार करतो.”

“त्यामुळे मी पुन्हा येणार नाही, असं म्हटलं नव्हते. मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, असेही म्हटलं नाही. मात्र, तेव्हा निषेध नोंदवला ही गोष्ट खरी आहे. मला जाणीवपूर्वक बोलू दिल जात नव्हते. यावेळीही मला बोलू दिलं जाणार नाही, असं दिसत आहे. काही लोक लोकशाहीच्या मंदिराला साष्टांग दंडवत घालतात. लोकशाहीची विटंबना करतात. त्यातील मी नाही,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.

Story img Loader