विधानपरिषदेतील आमदार प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. तो ठराव चर्चेला येऊन त्यावर मतदान झालं पाहिजे, असं आमदारांचा आग्रह आहे. पण, एकनाथ शिंदे यांच्या गटात नीलन गोऱ्हे यांनी प्रवेश केल्यानंतर दरेकांनी अविश्वाचारा ठराव मागे घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे ठाकरे गटाकडून नीलम गोऱ्हेंवर अविश्वासाचा ठराव दाखल झाला असेल, तर ते योग्यच आहे, अशी भूमिका आमदार भास्कर जाधव यांनी मांडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्कर जाधव विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. “या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या पदरात काही पडणार नाही. तरुणांच्या हाताला काही लागणार नाही. महिलांना न्याय दिला जाणार नाही. लोकशाहीची बूज राखली जाणार नाही. पाशवी बहुमताच्या अहंकारातून हे कामकाज चालवलं जाईल,” अशी टीका भास्कर जाधव यांनी सरकारवर केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav taunt devendra fadnavis over mi punha yein ssa