मुंबई : घाटकोपरमधील पेट्रोल पंपावर जाहिरात फलक कोसळला. या दुर्घटनेतील आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. आरोपीला एका रिसॉर्टवरून अटक करण्यात आली आहे.

जाहिरात फलक कोसळल्यानंतर लगेचच भिंडे याने अटकेच्या भीतीने पळ काढला. मुंबई पोलिसांचे पथक त्याच्या मुलुंड येथील घरी पोहोचले. पण तो पसार झाला होता. पोलिसांना त्याचे शेवटचे ठिकाण लोणावळा असल्याचे समजले त्यानंतर पोलिसांचे पथक तेथे पाठवण्यात आले. मात्र तो घटनास्थळी सापडला नाही. त्याचा मोबाईल बंद असून त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. लोणावळा येथून तो राजस्थानमध्ये पळाला. अखेर भिंडेला उदयपूर येथील रिसॉर्टमधून अटक करण्यात आली.

Contractor fined Rs 1.5 lakh for poor road work in Andheri
अंधेरीतील रस्त्याच्या निकृष्ट कामाप्रकरणी कंत्राटदाराला दीड लाख रुपये दंड
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
person murder construction worker,
पुणे : टोमणे मारल्याने बांधकाम मजुराचा खून करणाऱ्या एकाला जन्मठेप
badshah traffic violation allegation
बादशाहवर वाहतुकीचे नियम मोडल्याने झाली कारवाई? रॅपर स्वतः स्पष्टीकरण देत म्हणाला, “माझ्याकडे तर…”
Former Director General of Police Sanjay Pandey demands cancellation of extortion case in High Court Mumbai news
खंडणीचा गुन्हा रद्द करा; माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांची उच्च न्यायालयात मागणी
sangli murder case
सांगलीतील खून प्रकरणात पसार आरोपी अटकेत, खेड शिवापूर भागात कारवाई
crime branch arrests gangster with illegal pistol in dari pool area
गुंडाकडून दोन पिस्तूले, सहा काडतुसे जप्त; बाह्यवळण मार्गावरील दरी पूल परिसरात कारवाई

हेही वाचा…मुंबई : उमेदवारी मागे घेण्यासाठी अपक्ष उमेदवाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा, शिंदे गटाचा विभागप्रमुख व सचिवाविरोधात गुन्हा

इगो मीडिया कंपनीचा संचालक भिंडे याच्यावर यापूर्वी मुलुंड पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्ह दाखल आहे. २००९ मध्ये भिंडेने अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. त्यावेळी महापालिकेच्या परवानगी शिवाय फलक लावल्याप्रकरणी त्याच्यावर २१ वेळा कारवाई करण्यात आली होती. याशिवाय दोन वेळा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्या अंतर्गत त्याच्याविरोधात खटले दाखल होते. धनादेश न वठल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्या खटला चालतो. यापूर्वी २४ जानेवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात भिंडे यांच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा…के.सी. महाविद्यालयाचे सभागृह भाजपच्या कार्यक्रमासाठी दिल्याने वाद, युवा सेनेकडून मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे तक्रार

मुलुंडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांना याबाबत विचारले असता त्यांनी भिंडेवर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी यापूर्वीच आरोपपत्र दाखल केले असून मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.याशिवाय, मुलुंडमधून अपक्ष उमेदवार म्हणून २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी भिंडे १० वी पास असून त्याची दोन कोटी रुपयाची मालमत्ता असल्याचे त्याने जाहीर केले होते. त्यावेळी विधानसहा निवडणूकीत भिंडेला १४४१ मते पडली होती. पंतनगर पोलिसांनी सोमवारी रात्री जाहिरात फलक पडून अनेकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भिंडेविरोधात भादंवि कलम ३०४ (सदोष मनुष्यवध), ३३८ (गंभीर दुखापत), ३३७ (निष्काळजी कृत्यामुळे दुखापत करणे) व ३४ (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader