मुंबई : घाटकोपर येथील फलक दुर्घटनेप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर इगो मीडियाचा मालक भावेश भिंडे याने आता प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. घटनेनंतर जनतेत निर्माण झालेला संताप कमी करण्याच्या एकमेव उद्देशाने आपल्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा भिंडे याने प्रकरणातून दोषमुक्तीची मागणी करताना केला आहे.

भिंडे याने अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते व अटक बेकायदा ठरवून तातडीने जामिनावर सुटका करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही केली होती. उच्च न्यायालयाने मात्र, त्याची अटक कायदेशीर ठरवून त्याची याचिका फेटाळली होती. त्यानंतर, भिंडे याने सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सत्र न्यायालयाने ऑक्टोबर महिन्यात त्याला जामीन मंजूर केला होता. भिंडे याने आता आपण निर्दोष असल्याचा आणि आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवल्याचा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पाथाडे यांनी भिंडे याच्या अर्जावर पोलिसांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देऊन प्रकरणाची सुनावणी ७ डिसेंबर रोजी ठेवली आहे.

Action has taken against 26 accused in Baba Siddiquis murder under MOKA
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण अटकेतील २६ आरोपींवर मोक्का
Western Railway decided to run special local train on December 8 on occasion of Vasai Virar Marathon
वसई विरार मॅरेथॉनसाठी विशेष लोकल
Congress opposed MMRDA Bollywood Theme Park under 355 pillars on Andheri West to Mandale Metro 2B route
मेट्रो २ ब मधील बाॅलीवूड थीम पार्कला काँग्रेसचा विरोध, पैशांची उधळपट्टी असल्याचे सांगत एमएमआरडीएला पाठविले पत्र
A recent recruitment exam for various posts conducted by 21 Railway Recruitment Boards
अकरा लाख ४० हजार उमेदवारांनी दिली रेल्वे भरती परीक्षा, भारतीय रेल्वेची मेगा भरती
BMC Water Cut
Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरात आजपासून ५ दिवस पाणी कपात
Raj Kundra summoned by ED in porn racket case
Raj Kundra : हाय-प्रोफाइल पॉर्नोग्राफी रॅकेट प्रकरणी राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या, ED ने पाठवले समन्स
The oath taking ceremony of the new government in the grand alliance will be held at Azad Maidan Mumbai news
शपथविधी गुरुवारी; आझाद मैदानावरील सोहळ्याला पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांची उपस्थिती
MMR International Growth Hub roadmap prepared Mumbai news
‘एमएमआर’ आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब ,पारूप आराखडा तयार; मुंबईसह, सुरत, विशाखापट्टणम, वाराणसीचा समावेश

हेही वाचा…बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण अटकेतील २६ आरोपींवर मोक्का

दरम्यान, कंपनीच्या स्थापनेपासून ते दुर्घटनाग्रस्त महाकाय फलक लावले जाईपर्यंत आपण कोणत्याही प्रकारे कंपनीशी संबंधित नव्हतो. याउलट, सध्या जामिनावर असलेल्या प्रकरणातील सहआरोपी जान्हवी मराठे या कंपनीच्या संचालकपदी कार्यरत होत्या त्यामुळे, आपल्यावरील आरोप अस्पष्ट आणि संदिग्ध असून गुन्ह्यातील आपल्या सहभागाबाबत कोणताही ठोस पुरावा नसल्याचा दावाही भिंडे याने केला आहे.