भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाउंडमध्ये एक तीन मजली इमारत कोसळली, या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. या इमारत दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीला तब्बल २० तासांनंतर बाहेर काढण्यात एनडीआरफच्या जवानांना यश आले आहे. विशेष म्हणजे या व्यक्तीचा त्याच दिवशी वाढदिवसही होता. सुनील पिसाळ (३२) असे या व्यक्तीचे नाव असून त्यांना एनडीआरएफ आणि ठाणे आपत्ती निवारण दलाच्या जवानांनी सकाळी ८ त्या सुमारास बाहेर काढले. जेव्हा ते शुद्धीवर आले आणि पाहिलं त्यांना खऱ्या अर्थाने पुर्नजन्म मिळाल्यासारखे वाटले यावेळी त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची सुटका करण्यासाठी एनडीआरएफचे शर्थीचे प्रयत्न सुरु होते. यावेळी ढिगाऱ्यातून सुनिल पिसाळ यांना जवानांनी जिवंत बाहेर काढले. यावेळी त्यांना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांच्या नातेवाईक आणि मित्रांनी जल्लोष केला. पिसाळ यांची सहा महिन्यांची गर्भवती पत्नी आहे. तीही या ढिगाऱ्यात गाडली गेली मात्र त्यांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पिसाळ हे दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील एका गोदामात हमालीचे काम करत होते त्यावेळी अचानक ही इमारत खाली कोसळली.

Bhiwandi Building Collapsed: भिवंडीत इमारत कोसळून तिघांचा मृत्यू; ९ जखमी, दहा-बारा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

इमारत दुर्घटनेच्या या थरारक अनुभवाबद्दल सांगताना पिसाळ म्हणाले की, या दुर्घटनेच्या दिवशी ते गोदामात काम करत होते, यावेळी इमारतीला भेगा पडत असल्याचे दिसले, यावेळी तातडीने जीव वाचवण्यासाठी ते गोदामातील एका जाड काचेच्या भेगेत जाऊन बसले. यावेळी अचानक अंगावर इमारतीचा मलबा पडल्याने ते अडकले यानंतर अंगावर २० फुटाची भिंतही कोसळली. यावेळी ते छोट्याश्या अंतरावर अडकले होते. २० तास अन्न आणि पाण्याविना ते बचावासाठी आणि बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत होते. मात्र कितीही प्रयत्न करुनही त्यांना ते जमले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी NDRF च्या पथकाला काम करत असताना त्यांचा आवाज ऐकू आला. यावेळी एनडीआरएफच्या टीमने तातडीने त्यांना जिवंत बाहेर काढले. सुनिल पिसाळ जिवंत असल्याचे समजताच रात्रभर जागून काढलेल्या नातेवाईक आणि मित्रांनी आनंद व्यक्त केला, कारण त्याच दिवशी सुनिल पिसाळ यांचा वाढदिवस होता. ढिगाऱ्यातून सुखरुप बाहेर येताच त्यांनी NDRF च्या सर्व जवानांचे आभार व्यक्त केले. पण ही २० तासांची परीक्षा ते कधीच विसरणार नाहीत.

एनडीआरएफचे डेप्युटी कमांडंट दीपक तिवारी म्हणाले की, आम्ही २० तासांनंतरही पिसाळ यांना वाचवण्यात यशस्वी झालो याचा आम्हाला आनंद आहे. कारण अशा अपघातांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे बळी पडण्याची शक्यता अधिक असते.