महाराष्ट्र सदन आणि अन्य आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने तातडीने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे.
छगन भुजबळ हे सध्या महाराष्ट्र सदन गैरव्यवहाराप्रकरणी २७ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. घरचे जेवण, झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने श्वास घेणारे उपकरण आणि झोपण्यासाठी गादी उपलब्ध करून देण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती भुजबळ यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली होती. त्यास न्यायालयाने याआधीच परवानगी दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा