मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीएसटी भवनाच्या पाठोपाठ मराठी भाषा भवनाचं देखील भूमीपूजन केलं. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात “जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही; मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष आलाच.” असं बोलून दाखवलं. मराठी भाषा भवन चर्नी रोड गिरगाव येथे उभारण्यात येत आहे.

कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, मराठी भाषा विभागाचे अपर मुख्य सचिव भूषण गगराणी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
When Devendra Fadnavis becomes Chief Minister conspiracy is hatched to create communal tension says Amar Sable
“देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतात तेव्हा जातीय तणाव निर्माण करण्याचं षड्यंत्र…”- अमर साबळे
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
shivsena ubt adv harshal Pradhan
महाराष्ट्र पुढे जाणार तरी कसा?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड

“सरकारमध्ये रुसवे, फुगवे सुरू असल्याचं वातावरण तयार केलं जातय, मात्र…”; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा!

मुख्यमंत्री आपल्या भाषणात म्हणाले, “मराठी माणूस म्हटल्यावर त्याच्या आयुष्यात संघर्ष हा आलाच. त्याचप्रमाणे ज्यावेळी आपल्या देशाची भाषावार प्रांतरचना झाली, एक एक प्रांत मिळाला त्या प्रत्येक प्रांताला राजधानी मिळाली. मात्र मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला आपली राजधानी मुंबई ही मिळाली नाही तर ती लढून, रक्त सांडून, बलिदान देऊन मिळवावी लागली हा इतिहास आहे. त्याचं सुद्धा एक दालन आपण शिवाजी पार्क येथे केलेलं आहे, ते मला आणखी मोठं करायचं आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्यकाळ राहत नाही.”

तसेच, “मला अभिमान किंवा आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं का वाटत आहे, हे तुमच्या लक्षात येईल. की मुंबईसाठी ज्यांचे आजोबा लढले. मुंबई मिळाल्यानंतर मराठी माणसाचा गळा जेव्हा आवळला जात होता, तेव्हा मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी आणि शिवसेनेने केलं आणि आज इथे या पाटीवरती माझ्या आजोबांचा नातू आणि शिवसेनाप्रमुखांचा पुत्र म्हणून मुख्यमंत्री म्हणून माझं नाव लागलं. यापेक्षा आयुष्याचं सार्थक ते कोणतं असेल? हे मला किती जन्माचं पुण्य लाभलं आहे, त्याचा हिशोब मांडण्याचा मी अजिबात प्रयत्न करणार नाही.” असंही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

चर्चेतून आराखडा तयार होतो पण प्रत्यक्ष काम होत नाही –

याचबरोबर, “चर्चेतून आराखडा तयार होतो पण प्रत्यक्ष काम होत नाही. आपण आज प्रत्यक्ष काम करत आहोत. आपण जे काम करू ते जगातलं सर्वोत्तम काम असावे. देशातीलच नाही तर परदेशातील माणसं ही कामं पहायला यावीत, एखाद्या मातृभाषेचं मंदिर कसं असावे हे त्याला इथं येऊन कळावे. मातृभाषेचं मंदिर पहायला जगभरातून लोक यावीत. मुंबईत येणारा प्रत्येक पर्यटक  मराठी भाषा भवन पहायला यावा, त्याला मराठीची श्रीमंती कळावी, मराठी भाषेचा खजिना किती मोठा आहे हे त्याला कळावे.” अस यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.

मी टीकेला घाबरत नाही, टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय… –

तर, “महाराष्ट्रात मराठी भाषा शाळेत शिकवावी,  दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात हा कायदा करावा लागतो,  ही वेळ का आली, ही विचार करण्याची गोष्ट आहे. मराठी भाषेत बोला,  असं म्हटलं की आमच्यावर टीका होते, मी टीकेला घाबरत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहितीय मला त्याची काळजी नाही. जास्तीत जास्त भाषा शिकणं गुन्हा नाही पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये. मराठी भाषा भवनाला लागून मराठी रंगभूमी दालन उभे राहात आहे. मराठी रंगभूमीला स्वत:चा वैभवशाली इतिहास आहे. इंग्रजी आली पाहिजे, इतर भाषेचा मी द्वेष करत नाही, पण मराठी भाषेचा अपमान आम्ही सहन करणार नाही. पारतंत्र्य काय आहे हे आपल्याला बघायला मिळालं नाही हे आपलं नशीब आहे पण इंग्रजांच्या राजवटीत डोके ठिकाणावर आहे का? असा अग्रलेख लिहून इंग्रजाच्या डोक्‍यात मराठीला नेले ते लोकमान्य टिळकांनी.” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परखड मत व्यक्त केलं.

प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी –

याशिवाय, “प्रशासकीय मराठी भाषाही सोपी हवी. व्यपगत, नस्ती सारखे शब्द कळायला कठीण. हे काम सुभाष देसाई यांनी हाती घेतल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यांनी हे केलं नसतं तर आपण असतो की नाही, हा भगवा असता की नाही काही कळत नाही. शिवाजी महाराजांनी त्यांचे खलिते ही सोप्या भाषेत केले.” असं देखील यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर… –

“इतर भाषेचा द्वेष नको पण त्यांचे आक्रमण ही नको. कर्नाटकात मराठी भाषिकांवरचे अत्याचार सहन करायचे नाहीत. त्यांच्यावरील भाषिक अत्याचार आम्ही चालू देणार नाही, सहन करणार नाही. राज्यात मराठी शिकली पाहिजे हा अत्याचार नाही, दुकानाच्या पाट्या इथं मराठीत असल्याच पाहिजेत. पण आपण जेंव्हा असा आग्रह धरतो आणि  यामुळे ज्यांच्या पोटात दुखते त्यांच्या पोटदुखीचा उपचार करावाच लागेल. अटकेपार मराठी भाषेचा झेंडा नेणाऱ्या मराठी राज्याच्या राजधानीत मराठी भाषेला पुसण्याचं काम कुणी केलं तर त्याला धडा शिकवण्याची ताकत मराठी भाषेत आहेत. हे अत्याचार कदापि सहन केले जाणार नाहीत. आम्ही शिवरायांचे मावळे आहोत. छत्रपतीच्या तलवारीप्रमाणे मराठी भाषा आणि या भाषेचं तेज तळपलं पाहिजे. महाराष्ट्राच्या छत्रपतींच्या मातृभाषेचे हे मंदिर आहे, याचे काम करतांना कुठलीही कमी नसावी.” असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी केले.

Story img Loader