मुंबई : शहरासह दोन्ही उपनगरांतील विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे प्रगतीपथावर आहेत. सुमारे १ हजार ३३३ किलोमीटर रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असून उर्वरित रस्त्यांचे काँक्रिटीकरण दोन टप्प्यात सुरू आहे. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रिटीकरणाची कामे वेगाने पूर्ण झालीच पाहिजेत. काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा. काँक्रिटीकरण कामे अधिकाधिक गतीने पूर्ण व्हावीत, या दृष्टीने नियोजन करावे, अशी तंबी महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांनी मंगळवारी अधिकाऱ्यांना दिली. काँक्रिटीकरणाच्या कामांचा दर्जा, गुणवत्तेबाबत अजिबात तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही गगराणी यांनी ठणकावले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा