भारतीय चित्रपट शताब्दी सांगता सोहळा २ मे रोजी वांद्रे-कुर्ला संकुलात आयोजित करण्यात आला असून शताब्दीच्या निमित्ताने सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांमध्ये मराठी लघुपट व माहितीपट स्पर्धेसाठी घसघशीत रकमांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.
राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग, दादासाहेब फाळके चित्रनगरी आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या वतीने लघुपट व माहितीपट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  सवरेत्कृष्ट लघुपट व माहितीपटासाठी पहिले पारितोषिक एक लाख रुपये दुसरे पारितोषिक ५० हजार तर तिसरे पारितोषिक २५ हजार रुपयांचे आहे. तर उत्तेजनार्थ म्हणून दोन्ही विभागांतील दोन पारितोषिके प्रत्येकी १० हजार रुपयांची दिली जाणार आहेत.
जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ या दरम्यान मराठी भाषेत निर्मिलेल्या लघुपट व माहितीपटांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. संबंधित दिग्दर्शक, निर्माते, कलावंतांनी २५ फेब्रुवारीपर्यंत आपल्या प्रवेशिका ऑनलाईनद्वारे पाठवायच्या आहेत. mdmfscdc@gmail.com, mohitemangeshv@filmcitymumbai.com  अथवा http://www.filmcitymumbai.org या ईमेल व वेबसाईटद्वारे प्रवेशिका अर्ज पाठविता येतील.

Story img Loader