मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील वांद्रे – कुर्ला संकुल स्थानकाच्या बांधकामासाठी बड्या कंपन्या इच्छुक आहेत. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने स्थानकाचा आराखडा व बांधकामासाठी मागविलेल्या आर्थिक निविदा (टेकनिकल बिड) उघडल्या असून त्यात मेघा इंजिनियरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एमईआयएल-एचसीसीसंयुक्त) या कंपन्यांनी सर्वात कमी बोली लावल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- मुंबई: बेस्ट बसचालकाला मारहाण, आरोपीला अटक

मुंबई – अहमदाबाद हायस्पीड रेल्वे मार्गावर ४.९० हेक्टर जागेत वांद्रे – कुर्ला संकुल हे एकमेव भूमिगत स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचे फलाट जमिनीपासून सुमारे २४ मीटर खोलीवर नियोजित आहे. स्थानकात सहा फलाट असतील आणि प्रत्येक फलाटाची लांबी ४२५ मीटर (१६ डब्यांच्या बुलेट ट्रेनसाठी पुरेशी) इतकी असेल. या स्थानकात प्रवाशांसाठी नियोजित सुविधांमध्ये सुरक्षा, तिकीट, प्रतीक्षा क्षेत्र, बिझनेस क्लास लाउंज, नर्सरी, विश्रांती कक्ष, माहिती केंद्र, सार्वजनिक माहिती आणि घोषणा प्रणाली, सीसी टीव्ही कॅमेरा केंद्र इत्यादी सुविधा असतील. या कामांसाठी सुमारे एक हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हेही वाचा- ‘बोल राधा बोल’, ‘लाडला’,’दस’, ‘रेडी’ चित्रपटाचे निर्माते नितिन मनमोहन यांचं निधन

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या स्थानकाचा आराखडा व बांधकामासाठी ४ नोव्हेंबर २०२२ रोजी तांत्रिक निविदा उघडल्या होत्या. वांद्रे – कुर्ला संकुल स्थानक बांधण्यासाठी लार्सन ॲण्ड टुब्रो, जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड, ॲफकाॅन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि एमईआयएल-एचसीसी (संयुक्त) या कंपन्यांसह अन्य कंपन्यानी प्रतिसाद दिला होता. तांत्रिक निविदांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर, तांत्रिकदृष्ट्या पात्र बोलीदारासाठी आर्थिक निविदाही उघडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार पात्र बोलीदारांच्या आर्थिक निविदा उघडण्यात आल्या असून मेघा इंजिनियरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (एमईआयएल-एचसीसीसंयुक्त) या कंपन्यांनी कमी बोली लावल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा- मुंबई: पश्चिम रेल्वे विस्कळीत; धुक्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम

बुलेट ट्रेन स्थानकाची आणखी वैशिष्ट्य

  • स्थानकाला मेट्रो आणि रस्त्याची जोडणी असेल.
  • फलाट, कॉन्कोर्स आणि सर्व्हीस फ्लोअर असे तीन मजले असतील.
  • मेट्रो मार्गिका २ बी च्या जवळच्या मेट्रो स्थानकामध्ये प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेश
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big companies interested in construction of bandra kurla complex station of mumbai ahmedabad bullet train mumbai print news dpj