राज्य मंत्रिमंडळाची नुकतीच बैठक झाली असून विविध निर्णय आणि घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण आणणार असल्याचा निर्णय या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासह अनेक निर्णय सरकारने घेतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य यावेळी उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आठ निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार सामाजिक न्याय विभागात बार्टी, सारथी, महज्योती, अमृत या संस्थांच्या कार्यक्रमांत समानता आणण्यासाठी धोरण आखण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले आहे.

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

वित्त विभाग – महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई मधून शासकीय बँकिंग व्यवहार करता येणार

सामाजिक न्याय – महाप्रितमार्फत ठाण्यात समूह गृहनिर्माण प्रकल्प राबविणार. परवडणारी घरे मोठ्या प्रमाणावर उभारणार

सहकार व वस्त्रोद्योग – राज्यातील सूतगिरण्या सुरळीतपणे चालवणार. पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज शासन भरणार

ऊर्जा विभाग – कोराडीत सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावरील वीज प्रकल्पास मान्यता.

कामगार विभाग – इमारत व बांधकाम कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ गतीने मिळणार. कामगार नियमांत सुधारणा करणार

विधी व न्याय विभाग – राज्यात चार धर्मादाय सह आयुक्त पदांची निर्मिती करणार

पशुसंवर्धन विभाग – अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Big decision in cabinet meeting regarding barti sarathi mahjyoti amrit institutions government will plan policy sgk