काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज मुंबईमधील शिवाजी पार्क मैदानावर झाला. ‘भारत जोडो न्याय मंजिल’ या नावाने झालेल्या या सभेत इंडिया आघाडीतील देशभरातील नेते सहभागी झाले होते. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आपल्या खुमासदार शैलीत भाजपावर निशाणा साधला. इंडिया आघाडीला साकारण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह तेजस्वी यादव यांनी योगदान दिले होते. त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एनडीएत गेल्याबद्दल ते काय म्हणणार? याकडेही अनेकांचे लक्ष होते. त्यावर तेजस्वी यादव यांनी बिहारी शैलीत भाष्य केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तेजस्वी यादव म्हणाले, “बेरोजगारी, महागाई, गरिबी हे आपले सर्वात मोठे शत्रू आहेत. पण या शत्रूंवर चर्चा होत नाही. पंतप्रधान मोदी समुद्रात तळाशी जातात, चटईवर बसतात, त्याची मात्र जोरात चर्चा होते. पण शेतकऱ्यांना हमीभाव देण्याची चर्चा होत नाही. दोन कोटी रोजगाराचं काय झालं? १५ लाखांचं काय झालं? असा प्रश्न जेव्हा आम्ही विचारतो तेव्हा भाजपाचे लोक, माध्यमातील काही सहकारी एनर्जी ड्रिंक पिऊन आमच्यावर पलटवार करतात. आम्ही लढणारे लोक आहोत. आम्ही घाबरणार नाहीत. आम्ही जनतेसाठी लढत राहू.”

‘दिल्लीतल्या दोन नेत्यांना शरद पवारांनी झुलवत ठेवलं’, चंद्रकांत पाटील यांचा आरोप; म्हणाले, “बारामतीत त्यांचा हिशोब…”

माझे वडील लालू प्रसाद यादव आजारी असल्यामुळं डॉक्टरांनी त्यांना सभेला येण्यास परवानगी दिली नाही. त्यांना डॉक्टरांनी औषध घेण्यास सांगितलं आहे. पण लालू यादव पंतप्रधान मोदींना औषध देण्यास सक्षम आहेत. भाजपाशी लढता लढता त्यांचे केस पांढरे झाले, पण त्यांनी लढा सोडला नाही. पंतप्रधान मोदी खोटं बोलण्याची फॅक्टरी आहेत. ते खोटं बोलण्याचे उत्पादक, घाऊक व्यापारी आणि वितरकही आहेत. आम्ही यांच्याविरोधात लढत राहू, असंही तेजस्वी यादव म्हणाले.

महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही डिलर

तेजस्वी यादव पुढं म्हणाले, “महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस केलं गेलं. महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले आजचे नेते लीडर नाही तर डिलर आहेत. शरद पवारांच्या नावावर ज्यांनी मतं मागितली, ते भाजपाला जाऊन मिळाले. राहुल गांधींच्या नावावर मतं मागून काही लोक भाजपात गेले. तसेच शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नावावर मतं मागणारेही भाजपाला जाऊन मिळाले. यासाठी मी म्हणतो महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही डिलर आहेत. जे घाबरणारे लोक होते, ते तिकडे गेले. हे एकप्रकारे चांगलंच झालं.”

मॉडेल अनुकृती गोसाईची काँग्रेसला सोडचिठ्ठी; महिन्याभरापूर्वीच ईडीने बजावली होती नोटीस

महाराष्ट्रात आमदार नेले, माझे तर काका नेले

नितीश कुमार यांच्यावर टीका करताना तेजस्वी यादव म्हणाले, “भाजपावाले महाराष्ट्रात तर आमदारांना घेऊन गेले, बिहारमध्ये तर माझ्या काकांनाच घेऊन गेले. आम्ही देशात आता ऐकतो की मोदी गॅरंटी आहे. मोदी गॅरंटी सर्वात मजबूत आहे, असे भाजपाचे नेते सांगतात. आम्ही त्यांना सांगू इच्छितो की, तुम्हाला जी गॅरंटी द्यायची ती द्या, पण माझा काका परत पलटणार की नाही, ही गॅरंटी देऊन दाखवा. काका गेले तर गेले, पण बिहारची जनता आमच्याबरोबर आहे. सर्व्हेमध्ये काहीही दाखवू द्या, पण बिहारमध्ये सर्वांना आश्चर्यचकीत करणारा निकाल दिसेल.”

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bihar rjd leader tejashwi yadav slams maharashtra leaders in government says they are dealers kvg