लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबईः आरे कॉलनी येथे मंगळवारी बेस्ट बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत ४६ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्ती पाव वितरक होता. याप्रकरणी आरे सब पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकीस्वार सादिक खान हा उत्तर मुंबईतील विविध ठिकाणी पावाचे वितरण करायचा. मंगळवारी नेहमीप्रमाणे तो दुचाकीवरून आरे कॉलनीत जात असताना बेस्टने त्याच्या दुचाकीला धडक दिली. बस क्रमांक ४५२ गोरेगाव स्थानकाहून मयूर नगरकडे जात असताना हा अपघात झाला. ती बस चालक रमेश लोंढे चालवत होता. मालाड पूर्व येथील दिंडोशी येथील रहिवासी असलेल्या खानला बसने दिलेल्या धडकेनंतर तो रस्त्यावर पडला. त्याच्या डोके बसच्या मागील चाकाखाली चिरडले गेले. परिसरातील नागरिकांनी खानला तात्काळ रुग्णालयात नेले, परंतु रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी प्रत्यक्षदर्शी आणि चालकाचा जबाब नोंदवला.