मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोप – प्रत्यारोपांनी गाजलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. तत्पूर्वी मराठीबहुल प्रभादेवी – दादर – माहीम, वरळी आणि शिवडी मतदारसंघातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी घरोघरी जाऊन नागरिकांची भेट घेण्याऐवजी दुचाकी प्रचारफेरी घेण्यावर भर दिला. या प्रचारफेरीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी करत शक्तिप्रदर्शन केले.
अरे आवाज कुणाचा?, ही ताकद कुणाची?, कोण आला रे कोण आला, लक्षात ठेवा लक्षात ठेवा आपली निशाणी लक्षात ठेवा आदी विविध घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी मतदारसंघ दणाणून सोडला होता. तसेच प्रचारादरम्यान उमेदवारांनी एकमेकांवर अप्रत्यक्षरित्या टोलेबाजीही केली. अनेक ठिकाणी विविध उमेदवारांच्या प्रचारफेरी रस्त्याच्या दुतर्फा एकमेकांसमोरही आल्या. बहुसंख्य कार्यकर्त्यांनी गळ्यात आपापल्या पक्षाचे शेले, खिशाला पक्षचिन्हाचा बिल्ला, रखरखत्या उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर टोपी आणि हातात झेंडे घेऊन हजेरी लावली होती. काही कार्यकर्ते हेल्मेट घालून तर काही कार्यकर्ते गोलाकार टोपी घालून दुचाकीवर स्वार झालेले पाहायला मिळाले. कुठे कच्छी बाजा; ढोल – ताशा, तर कुठे बेंजो आणि बँडच्या तालावर कार्यकर्ते थिरकलेले पाहायला मिळाले. अनेक कार्यकर्ते फोटो, चित्रफित आणि सेल्फी काढण्यात मग्न झालेले पाहायला मिळाले. या दुचाकी प्रचारफेरीदरम्यान विविध चाळी व इमारती आणि नाक्यानाक्यांवर उमेदवारांवर फुलांची उधळण होत होती. तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुचाकी प्रचारफेरीमुळे विविध मतदारसंघात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. मात्र वाहतूक पोलिसांनी चोख नियोजन करत वाहतूक पूर्ववत केली. तसेच विविध पेट्रोल पंपवर दुचाकीच्या मोठ्या रांगा पाहायला मिळाल्या.
हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : मुंबईत ७६ क्रिटीकल मतदान केंद्र
दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातील तिरंगी लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांच्या प्रचारफेरीत शिवसेना नेते आदित्य ठाकरे, दिवाकर रावते आदी महत्वाच्या नेते व पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी आदित्य यांनी कार्यकर्त्यांमध्ये मिसळत ढोल – ताशा वाजवण्याचा आनंदही लुटला. तर शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांच्या दुचाकी प्रचारफेरीत कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. यावेळी सरवणकर यांच्या आजवर केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यासह वर्षाचे ३६५ दिवस जनतेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन करण्यात आले. तसेच वरळी विधानसभा मतदारसंघातील महायुतीतील शिंदे गटाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनीही दुचाकी प्रचारफेरी काढत प्रचार मोहिमेचा शेवट केला. तर वरळी विधानसभेतील मनसेचे उमेदवार संदीप देशपांडे यांनी रविवारीच दुचाकी प्रचारफेरी काढत शक्तिप्रदर्शन केले. तसेच प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्य पक्षांच्या उमेदवारांची एलइडी स्क्रीनवर माहिती देणाऱ्या गाड्या रस्त्याच्या दुतर्फा पाहायला मिळाल्या. तर अपक्ष उमेदवारांचेही प्रचार फलक हे टॅक्सी व इतर वाहनांवर झळकत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय मंडळींनी कंबर कसून प्रचार केल्यानंतर विजयाची माळ कोणकोणत्या उमेदवारांच्या गळ्यात पडते, हे पाहणे निर्णायक ठरेल.
मनसेच्या व्यासपीठावर महायुतीचे झेंडे; बाळा नांदगावककरांचे व्हीलचेअरवरून भाषण
शिवडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा देत असल्याची घोषणा मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार ॲड. आशिष शेलार यांनी केली होती. या अनुषंगाने राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या प्रचारार्थ लालबागमध्ये घेतलेल्या सभेच्या व्यासपीठावर मनसेसह महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) आणि रिपाई (रामदास आठवले) पक्षाचे झेंडे पाहायला मिळाले. या सभेत राज ठाकरे यांनी विशेषतः उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तर पायाला दुखापत झाल्यामुळे बाळा नांदगावकर यांनी व्हीलचेअरवर बसून भाषण केले. तसेच या सभेला मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.
अजय चौधरींना घेऊन सुधीर साळवी बुलेटवर स्वार
शिवडी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अजय चौधरी आणि सुधीर साळवी यांच्यात संघर्ष झाला होता. अखेर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना उमेदवारी दिली. त्यानंतर साळवी यांचे समर्थक नाराज होऊन शिवडी विधानसभेत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र साळवी यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहत चौधरी यांना पाठिंबा देण्याचे निश्चित केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी निघालेल्या दुचाकी प्रचारफेरीत चौधरींना घेऊन साळवी बुलेटवर स्वार झाले होते आणि आम्ही एकत्रच आहोत, असा संदेश मतदारांना दिला.
आदित्य ठाकरेंची वरळी विधानसभेत दुचाकी प्रचारफेरी; आई रश्मी ठाकरे सुद्धा उपस्थित
शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख व वरळी विधानसभेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघ परिसरात दुचाकी प्रचारफेरी काढली. या प्रचारफेरीत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती, तसेच आदित्य यांची आई रश्मी ठाकरे या सुद्धा सहभागी झाल्या होत्या. वरळी गाव बस स्थानकापासून सुरू झालेली ही प्रचारफेरी गणपतराव कदम मार्गावरून करी रोड नाका मार्गे सातरस्ता येथील जे. आर. बोरीचा मार्ग येथे समाप्त झाली. या ठिकाणी आदित्य यांनी शेवटची प्रचार सभा घेत मशाल चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन केले. तसेच करोनाकाळात महाराष्ट्राच्या मागे खंबीरपणे उभे राहणाऱ्या उद्धव ठाकरे यांना मतदानाच्या रुपाने साथ द्या, अशी सादही घातली. यावेळी खासदार अरविंद सावंत, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर, माजी महापौर किशोरी पेडणेकर आदी उपस्थित होते.
अमित ठाकरेंच्या प्रचारफेरीत ढोल – ताशांसह टाळ – मृदुंगांचाही गजर
दादर – माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी अमित यांनी जोरदार प्रचार करत घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेण्यावर भर दिला होता. तर त्यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी दुचाकी प्रचारफेरी काढत शक्तिप्रदर्शन केले. या प्रचारफेरीत मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. तसेच पक्षचिन्ह असलेली रेल्वे इंजिनची प्रतिकृती लक्षवेधी ठरली. यावेळी अमित यांच्यासह पत्नी मितालीही सहभागी झाल्या होत्या. तसेच कोळी बांधव आणि वारकरी सुद्धा सहभागी झाले होते. यावेळी बँड, ढोल – ताशांच्या गजरासह टाळ – मृदुंगांचाही गजर सुरू होता.