बीकेसी परिसरात दोन तरुणींना दुचाकीवर बसवून धोकादायक साहसी कृत्ये करणाऱ्या दुचाकीस्वाराला अखेर बीकेसी पोलिसांनी अटक केली. आरोपीच्या साहसी कृत्यांची चित्रफीत समाज माध्यमांवर खूप वायरल झाली होती. त्यानंतर अनेकांनी दुचाकीस्वारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. अटक आरोपीविरोधात यापूर्वी अँटॉपहिल, वडाळा टीटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून यापूर्वी त्याला तडीपार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : गतीमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक

ट्विटरवर १३ सेकंदांची चित्रफीत वायरल झाली होती. त्यात दोन तरुणींना दुचाकीवर बसवून तरुण स्टंटबाजी करत असल्याचे दिसत होते. तरुणाच्या पुढे एक आणि मागे एक अशा दोन तरुणी बसल्या आहेत आणि तो गाडी उडवत असल्याचे चित्रफितीत दिसत होते. या तरुणाने धावत्या दुचाकीचे पुढचे चाक उचलले आहे आणि एका चाकावर ही दुचाकी त्याने काही मीटरपर्यंत चालवली. त्याच्यासोबत दोन तरुणीदेखील होत्या. दुचाकीवर बसलेल्या मुली हातवारे करत होत्या, हसत होत्या. तसेच दुचाकीवर बसलेल्या तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलेले नव्हते. पोथोलवॉरियर्स या ट्विटर हँडलवरून ही चित्रफीत अपलोड करण्यात आली होती. समाज माध्यमांवर याप्रकरणी नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर बीकेसी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी फैय्याज अहम आजीमुल्ला कादरी (२४) याला अटक केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bike rider arrested by mumbai police for performing dangerous stunts mumbai print news zws
Show comments