लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : गोवंडी येथील शिवाजी नगर जंक्शनजवळ बेस्ट बसच्या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बेस्ट बस शिवाजी नगर येथून कुर्ल्याच्या दिशेने जात असताना दुचाकीस्वार बसच्या मागच्या बाजूला धडाकला. त्यानंतर चालकाला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल कारण्यापूर्वीच दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

आणखी वाचा-मंत्रिमंडळाचा आज विस्तार, नागपुरात शपथविधी; नावे गुलदस्त्यातच

दीक्षित विनोद राजपूत (२५) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. शिवाजी नगर जंक्शन येथील महामार्गावर शनिवारी मध्यरात्री हा अपघात घडला. बेस्ट बस चालक विनोद आबाजी रणखांबे बस क्रमांक ३७५ शिवाजी नगर येथून कुर्ल्याच्या दिशेने घेऊन जात होते. त्यावेळी दुचाकी बसच्या मागच्या बाजूला धडकाली. त्यात मागच्या चाकाच्या संपर्कात आल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला घाटकोपर येथील राजवाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला असून याप्रकारणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरु आहे.

Story img Loader