मुंबई : भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीने एका दुचाकीला आणि नंतर एका पादचाऱ्याला जोरदार धडक दिल्याची घटना मंगळवारी रात्री मुलुंड परिसरात घडली. या अपघातात ७६ वर्षीय पादचाऱ्याचा मृत्यू झाला असून याबाबत मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल करून मोटारगाडी चालकाला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

 मुलुंडच्या बी. पी. क्रॉस रोडवर मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या मोटारगाडीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यानंतर मोटारगाडीने दुचाकीला धडक दिली. त्यानंतर एका पादचाऱ्याला धडक देत मोटारगाडी दुभाजकावर जाऊन आदळली. या भीषण अपघात दुचाकीचे तीन तुकडे झाले. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ जखमी पादचारी आणि दुचाकीस्वाराला रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात उपचार सुरू असताना पादचारी तुकाराम सावंत (७६) यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा >>> मालाडमध्ये झाड पडून एक जण ठार

अपघाताच्या वेळी मोटारगाडीत दोन तरुण आणि दोन तरुणी होत्या. मात्र  अपघातानंतर यातील तिघांनी पोबारा केला. एका तरुणीला स्थानिक रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुलुंड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून मोटारगाडी चालक अमरेश यादव (२२) याला अटक केली. मोटारगाडीतील चौघांनी मद्य सेवन केले होते का याबाबत याबाबत पोलीस तपास करीत आहेत.