डंपरने दिलेल्या धडकेत एका ४८ वर्षीय मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. मालवणीच्या मार्वे रोडे येथे शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात घडला. मणिकम चेट्टी असे या मृत वाहनचालकाचे नाव आहे. शुक्रवारी संध्याकाळी ते मोटारसायकलीवरून चारकोप नाक्यावरून जात होते. त्यावेळी त्यांनी एका बसच्या पुढून वळण घेतले. त्यावेळी ते बेस्ट बस आणि डंपरच्या मध्ये सापडले. त्यामुळे भरधाव डंपरने त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली.