विना हेल्मेट दुचाकी घेऊन जाणाऱ्या दुचाकीस्वाराला अडवल्याच्या रागातून त्याने पोलिसांवर हल्ला चढविल्याची घटना भोईवाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी आर्यन वर्मा (२२) विरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला समज (नोटीस) देऊन सोडले आहे. आरोपीच्या दुचाकीवर क्रमांक नोंद (नंबरप्लेट) नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>> धक्कादायक: मुंबईत दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा निर्घृण खून, चाकूने केले वार
भोईवाडा वाहतूक विभागात कार्यरत असलेले नितीन शंकर वाघमारे (३८) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३१ जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता गस्तीदरम्यान खानोलकर चौक ते ई बॉर्जेस मार्गाने गस्त करत असताना दुचाकी चालक हा भरधाव वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून आले. तो विनाहेल्मेट होता तसेच त्याच्या वाहनावर नंबर प्लेट देखील नव्हती. त्याची गाडी थांबवली असता त्याच्या रागात त्याने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्याला टॅक्सीत बसवून भोईवाडा येथील वाहतूक चौकीत नेले. तेथेही त्याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा >>> Jaipur Express Firing : हल्लेखोर आरपीएफ जवान वकिलांना म्हणाला, “मी निर्दोष आहे, मी गोळीबार…”
सर्वाना जीवेठार मारण्याची धमकी दिली. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा आरडा ओरडा सुरु होता. काही समजण्याच्या आतच त्याने खिशातून चाकू काढून मारण्याची धमकी दिली. टोइंग गाडीवर काम करणाऱ्या श्रेयस सुर्वे याच्या छातीवर वार करताच तो वेळीच मागे झाल्यामुळे थोडक्यात वाचला. या हल्ल्यात तो किरकोळ जखमी झाला. त्यापाठोपाठ अन्य कर्मचारी शैलेश गायकवाड याच्या अंगावर वार केला. त्याच्या हल्ल्याच्या भीतीने मागे झाले. अखेर, अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्याच्या हातातील चाकू काढून घेत त्याला पोलिसांना याबाबत माहिती दिली. चौकशीत त्याचे नाव आर्यन वर्मा (२२) असून त्याची मानस्थिती ठीक नसल्याचे समजले. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.