लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबईः दुचाकीवरून तिघे प्रवास करत असल्यामुळे थांबण्याचा इशारा दिला असता दुचाकी चालकाने वाहतुक पोलिसालाच धडक दिल्याचा प्रकार सांताक्रुझ पूर्व येथे रविवारी रात्री घडला. या अपघातात वाहतुक पोलीस जखमी झाला असून दुचाकी चालकाविरोधात वाकोला पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
bail POCSO, High court grants bail,
पोक्सोअंतर्गत अटकेत असलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन
buldhana crime latest marathi news
समृद्धी महामार्गावर अपघातांसह गुन्हेगारीतही वाढ; डिझेल चोरीसाठी महागड्या वाहनांचा वापर…
pune incident of speeding car hitting couple on two wheeler on flyover in Gultekdi
मोटारचालकाची मुजोरी; उड्डाणपुलावर दुचाकीस्वार दाम्पत्याला धडक, दाम्पत्याला मदत न करता मोटारचालक पसार
Pune Accident
Pune Accident : “अचानक डंपरचा मोठा आवाज आला, आम्ही जागेवरुन उठून पुढे जाईपर्यंत…”, प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Ajit Pawar Statement About Santosh Deshmukh Case
Santosh Deshmukh Murder : अजित पवारांचं संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत भाष्य; “सिव्हिल सर्जन म्हणाला, पोस्टमॉर्टेम करताना आजवर इतकी वाईट…”

तक्रारदार पोलीस हवालदार विजय चव्हाण(४८) वाकोला वाहतुक शाखेत कार्यरत आहेत. रविवारी रात्री ते सांताक्रुझ पूर्व येथील गेट क्रमांक ८ येथे वाहतुक नियमानासाठी तैनात होते. त्यावेळी परिसरात एका दुचाकीवर तिघेजण प्रवास करत असल्याचे चव्हाण यांना दिसले. दूरूनच पाहिल्यानंतर चव्हाण यांनी त्यांना थांबण्याचा इशारा दिला. पण दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवण्याऐवजी भरधाव वेगाने चालवण्यास सुरूवात केली. त्यानंतरही चव्हाण यांनी त्याला थांबवण्याचा इशारा दिला. पण दुचाकीस्वाराने थेट चव्हाण यांना धडक दिली. त्यावेळी चव्हाण खाली कोसळले. त्यांना तातडीने व्हीएन देसाई रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी सोमवारी पहाटे चव्हाण यांच्या तक्रारीवरून दुचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader