मुंबई : ‘नेटफ्लिक्स’वर सध्या प्रसारित झालेल्या ‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात फ्लेमिंगो पक्ष्यांचे ड्रोनच्या साह्याने चित्रीकरण करण्यात आल्याने पक्षिप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ड्रोनमुळे फ्लेमिंगो जखमी होण्याची वा विचलित होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत पक्षिप्रेमींनी व्यक्त केले.
‘सिकंदर का मुकद्दर’ या चित्रपटात ड्रोन कॅमेरा फ्लेमिंगोंच्या अगदी नजीक नेत चित्रीकरण करण्यात आले आहे. नेरुळ येथील टीएस चाणक्य खाडीत हे चित्रीकरण करण्यात आल्याचे निसर्गप्रेमींनी सांगितले. चित्रीकरणात ड्रोनच्या पात्यांमुळे फ्लेमिंगो जखमी होण्याची शक्यता आहे. तसेच ड्रोनचा आवाजही बऱ्यापैकी असतो, यामुळे फ्लेमिंगो विचलित होऊन त्यांच्या अधिवासातून बाहेर येऊ शकतात. यामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते. याअगोदरही या परिसरात अनेक फ्लेमिंगोचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, याबाबत पर्यावरणवादी, तसेच पक्षिप्रेमींनी कांदळवन कक्ष आणि महाराष्ट्र मुख्य वन नियंत्रक यांच्याकडे तक्रार केली आहे.
चित्रपटात फ्लेमिंगोचे दृश्य १:०३:४४ ते १:०३:५४ या इतक्या वेळेत दिसते. ते ड्रोनद्वारे करण्यात आल्याचे दिसत आहे. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्व्हेशन ऑफ नेचर’मधील फ्लेमिंगोची संख्या असुरक्षिततेच्या म्हणजेच लाल यादीत समाविष्ट आहे. त्यांची काळजी घेणे आणि त्यांचा अधिवास धोक्यात घालण्यापासून वाचवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे, असे पक्षिप्रेमी ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले.
‘अहवालाची प्रतीक्षा’
पर्यावरणप्रेमींनी याबाबत ‘नेटफ्लिक्स’, चित्रपट निर्माते, तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्त, एनआरआय पोलीस ठाणे आणि सिडको यांच्याकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने फ्लेमिंगोच्या महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक डीपीएस फ्लेमिंगो तलावाचे संवर्धन करण्याच्या पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी आणि अहवाल देण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली आहे. समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, असे पर्यावरणप्रेमी बी. एन. कुमार यांनी सांगितले.