नमिता धुरी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कायम अधिवास असणारे पक्षी, दुर्मीळ प्रजाती, स्थलांतरित पक्षी अशा ‘संजय गांधी राष्ट्रीय उद्याना’तील पक्षीविश्वाच्या वैविध्याचा एक लिखित ऐवज जमा व्हावा या हेतूने राष्ट्रीय उद्यानात २०२१ ते २०२५ या कालावधीत नियमितपणे पक्षीनिरीक्षण केले जाणार आहे. याबाबतचा करार राष्ट्रीय उद्यान आणि ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) यांच्यात १६ फेब्रुवारीला झाला आहे.

या प्रकल्पातील पहिले पक्षीनिरीक्षण २८ फे ब्रुवारीला करण्यात आले. सत्तरहून अधिक जणांचा सहभाग असलेल्या या निरीक्षणात १०८ प्रजातींची नोंद झाली. २१ मार्चला दुसऱ्या निरीक्षणात ८० जणांनी सहभाग घेतला होता आणि ११२ प्रजातींची नोंद झाली. हाथी गेट ते कल्व्हर्ट २० (पूल), कल्व्हर्ट २० ते तुळशी तलाव, तुळशी तलाव ते तुळशी द्वार, ठाकू रपाडा ते भूतबंगला, कान्हेरी ते फणसाचं पाणी, जांभूळ माळ, शिलोंडा ट्रेल, नागला ब्लॉक, तुंगारेश्वर प्रवेशमार्ग, तुंगारेश्वर मंदिर, पटोनापाडा ते भिंडी नाला, पत्रांचे बंगलो ते गोल कडं हे पक्षी निरीक्षणाचे मार्ग आहेत.

डॉ. पर्विश पंड्या, सौरभ सावंत आणि दिप्ती हमरासपूरकर या पक्षीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे निरीक्षण सुरू आहे. ‘परदेशात अगदी छोट्या-छोट्या जंगलांमधील पक्षीनिरीक्षणाची कि मान ५० वर्षांची माहिती जतन के लेली असते. आपल्याकडे तशी पद्धत नाही. राष्ट्रीय उद्यानातील पक्षीवैभवाची माहिती शास्त्रीय पद्धतीने जमा क रून ती शास्त्रीय पद्धतीनेच लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. म्हणूनच आता सलग ५ वर्षे निरीक्षण के ले जाणार आहे’, असे डॉ. पंड्या म्हणाले. आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणात ब्राऊन हॉक आऊल, ग्रे-नेक्ड बंटिंग आणि छोट्या कानांचे घुबड इत्यादी प्रजाती दिसून आल्याची माहिती बीएनएचएसचे राजू कसंबे यांनी दिली. निरीक्षणाचा अहवाल ई-बर्ड या संके तस्थळावर प्रकाशित के ला जाणार आहे.

पक्षीनिरीक्षण कसे ?

एक तज्ज्ञ, एक वनसंरक्षक (फॉरेस्ट गार्ड) आणि इतर पक्षीनिरीक्षक असे काही गट महिन्यातून एकदा सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत निरीक्षण करतात. प्रत्येक गट विविध ठिकाणांपासून २ ते ३ किमी अंतर चालतो. दर १५ मिनिटांनी एक यादी तयार होते. कोणता पक्षी कोठे दिसला, काय करत होता, इत्यादी नोंद घेतली जाते. सलग काही वर्षे अशाप्रकारे निरीक्षण के ल्यानंतर ऋतूनुसार किं वा फळा-फु लांच्या मोसमानुसार स्थलांतर करणारे पक्षी, स्थानिक प्रजाती, पक्ष्यांची एकू ण संख्या, बदलत जाणारी संख्या, इत्यादी माहिती मिळते. याच्या आधारे पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करता येतात. २०१३-१४ साली झालेल्या निरीक्षणात १९४ प्रजाती दिसल्या होत्या.