मुंबई : माजी मंत्री झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी उर्फ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतही लॉरेन्स बिष्णोई टोळीचा सहभागाच्या चर्चेमुळे पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये सक्रीय असलेल्या लॉरेन्स बिश्नोई टोळी महाराष्ट्रातही हातपास पसरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. अमेरिका, कॅनडा येथून या टोळीचा कारभार चालवणाऱ्या अनमोल बिष्णोईने यापूर्वी अभिनेता सलमान खान याच्या घरावरही गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. समाज माध्यमांचा वापर करून ही टोळी राज्यात हातपाय पसरत आहे.

हेही वाचा >>> तीन विमानांमध्ये बॉम्ब असल्याचे दूरध्वनी; दोन विमाने मुंबईत थांबवली, एक दिल्लीला वळवले

What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
isha deol reveal dharmendra did not like short dress for daughters
“वडील घरी आल्यावर आम्ही सलवार कुर्ता घालायचो”, ईशा देओलने धर्मेंद्र यांच्याबद्दल केलेला खुलासा; म्हणालेली, “त्यांना मी १८ व्या वर्षी…”
suniel shetty injured on hunter movie set
अभिनेता सुनील शेट्टीचा सेटवर झाला अपघात, स्वतःच अ‍ॅक्शन सीन शूट करताना झाला जखमी
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना
Vijay Deverakonda fell down the stairs video goes viral on social media
Video: जिना उतरताना जोरात पडला विजय देवरकोंडा, व्हिडीओ होतोय व्हायरल
Salman Khan And Hema Sharma
“जर तुम्ही सलमान खानला चॅलेंज दिले तर तुमचे करिअर…”, ‘बिग बॉस १८’फेम व्हायरल भाभीचे वक्तव्य चर्चेत; म्हणाली, “पण मी असा इतिहास…”

मालाड पूर्व येथील केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या ५३ वर्षीय व्यक्तीला बिष्णोई टोळीच्या नावाने धमकी देण्यात आली आहे. बिष्णोई टोळीचे हस्तक तुरुंगात आहेत .त्यांना सोडवण्यासाठी २० लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. गेल्यावर्षी २० जुलैला एका व्यावसायिकाला १८५५ या क्रमांकापासून सुरू होणाऱ्या क्रमांकावरून हा दूरध्वनी आल्यामुळे तो परदेशातून करण्यात आल्याचे भासवण्यात आले आहे. या धमकीमागे खरंच बिष्णोई टोळीचा सहभाग आहे का, याबाबत दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रसिद्ध गायक सिद्धु मुसेवाला हत्येत लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग होता. या प्रकरणानंतर ही टोळी चांगलीच चर्चेत आली होती. या हत्येत राज्यातील संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांचीही नावे चर्चेत आली होती. त्यावेळी ही टोळी राज्यातही त्यांचे जाळे पसरवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. जाणकारांच्या माहितीनुसार, ही टोळी समाज माध्यमांचा वापर प्रचारासाठी करत असून त्याच्या माध्यमांतून तरूणांना लॉरेन्स बिष्णोई नावाबाबत असलेली उत्सुकता हेरून टोळी राज्यात हातपाय पसरत आहे.

हेही वाचा >>> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाही, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबमधील उच्चभ्रू कुटुंबात झाला आहे. अबोहर इथल्या कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्याचे आई-वडील लविंदर आणि सुनिता सुरूवातीपासूनच श्रीमंत होते. त्यांची वडिलोपार्जीत शेकडो एकर जमीन आहे. तसेच लॉरेन्सचे कुटुंबिय चांगल्या पदावर कार्यरत आहेत. लविंदर हे पोलीस हवादार पदावर कार्यरत होते.त्याच्या वडिलांना त्याला पोलीस अधिकारी बनवायचे होते. पण लॉरेन्सने वेगळा मार्ग निवडला. महाविद्यालयात असतानाच विद्यार्थी संघटना स्थापन केली होती. त्या माध्यमातून पुढे त्याने टोळी उभी केली. चंदीगडमध्ये शिक्षणासाठी गेल्यावर लॉरेन्सने गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत.

लॉरेन्स विरोधात पंजाब, दिल्ली, राजस्थान इथे त्याच्याविरोधात गुन्हे नोंद केले गेलेत. भरतपूर कारागृहानंतर त्याला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये ठेवण्यात आले होते. सद्या तो अहमदाबादच्या साबरमती मध्यवर्ती कारागृहात आहे. त्यांच्या अटकेनंतरही त्याचे हस्तक अनमोल बिष्णोई, गोल्डी ब्रार, रोहित गोदारा यांनी परदेशातून टोळीच्या कारवाया सुरू ठेवल्या आहेत. गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येनंतर पंजाब, राजस्थान आणि हरियाणामध्ये दहशत निर्माण केलेल्या या टोळीने मुंबईतील सलमान खान व बाबा सिद्दीकी यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळे ही टोळी आता महाराष्ट्रातही पाय पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असे निरीक्षण आजी, माजी अधिकाऱ्यांनी मांडले आहे.