अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील ९ आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये रविवारी ( २ जुलै ) मंत्रीपदाची शपथ घेतली. यात ईडीच्या रडारावर असलेल्या हसन मुश्रीफ यांचाही समावेश आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष भ्रष्टाचारी असल्याची टीका केली होती. तर, किरीट सोमय्यांसह भाजपाच्या नेत्यांनीही राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुप्रिया सुळे यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वेळोवेळी राष्ट्रवादीला भ्रष्ट पक्ष म्हटलं, पंतप्रधान मोदींनीही भ्रष्टाचाराचे आरोप केले. याच लोकांबरोबरच भाजपाने सरकार स्थापन केलं, असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. यावर सुप्रिया सुळेंनी याच उत्तर भाजपाला विचारलं पाहिजे, असं म्हटलं आहे.

हेही वाचा : “यावेळी ‘डील’ पक्के आहे, अजित पवार हे…”, ठाकरे गटाचा मोठा दावा; एकनाथ शिंदेंनाही केलं लक्ष्य!

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “याचे उत्तर भाजपाला विचारलं पाहिजे. ‘नॅशनल करप्ट पार्टी’ हे भाजपा आमच्याबद्दल बोलला आहे. भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप राष्ट्रवादीवर केले आहेत. मग, या प्रश्नाचं उत्तर मला विचारण्यापेक्षा भाजपाला विचारले पाहिजे.”

हेही वाचा : बंडाच्या एक दिवस आधीच पक्षानं घेतला होता मोठा निर्णय? अजित पवार गट अडचणीत येणार?

“राष्ट्रवादीतून बाहेर गेलेले सर्व लोक सहकारी नाहीत, तर कुटुंबातील लोक आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक कुटुंब म्हणून दोन-अडीच दशके काम करत आहे. शरद पवार हे सर्वांसाठी अतिशय प्रिय आहेत. शरद पवारांनी सर्वांना घरातील मुलासारखं वागवलं. त्यामुळे ही झालेली घटना आम्हाला वेदना देणारी नाही. पण, त्याची काही कारणं असतील,” असेही सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp allegation corrupation on ncp say supriya sule on ajit pawar oath ssa