मुंबई : मुस्लीम समाज भाजपविरोधात एकगट्ठा मतदान करून ‘व्हाेट जिहाद’ करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्षात मुस्लीमबहुल ३८ विधानसभा मतदारसंघांत महायुतीने विधानसभेच्या २१ जागा जिंकल्याने भाजपचा आरोप निराधार असल्याचे समाजवादी पक्षाचे भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.

राज्यातील मुस्लीमबहुल ३८ विधानसभा मतदारसंघात २० ते ५२ टक्क्यांपर्यंत मुस्लीम लोकसंख्या आहे. अशा मतदारसंघांत महायुतीने २१ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत. जिंकणारे सर्व आमदार हिंदू आहेत. मुस्लीम समाजाचा ‘व्होट जिहाद’ असता तर महायुतीचे या मतदारसंघांत मोठ्या संख्येने उमेदवार जिंकले नसते. ‘व्होट जिहाद’च्या नावाखाली मुस्लीम समाजाला भाजप बदनाम करत आहे, असा आरोप शेख यांनी केला.

हेही वाचा – नवे सरकार सत्तेवर येताच अदानी समुहाकडून धारावीत जोरदार फलकबाजी, बहुभाषिक धारावीत गुजराती फलकांचाही समावेश

हेही वाचा – महापालिका प्रशासनाविरोधातील आंदोलनाला ‘मातोश्री’वरून पाठबळ; सर्व आमदार, खासदारांना आंदोलनात सहभागी होण्याचे आदेश

विधानसभेला महायुतीने ६ आणि महाविकास आघाडीने ११ मुस्लीम उमेदवार दिले होते. पैकी १० मुस्लीम उमेदवार निवडून आले. त्यामध्ये काँग्रेस ३, समाजवादी २, अजित पवार राष्ट्रवादीचे २, शिंदे शिवसेनेचा १, उद्धव ठाकरे गटाचा १ आणि एमआयएमचा १ आमदार आहे. राज्यात ११.५६ टक्के मुस्लीम समाज असून, विधानसभेत ३.४७ टक्के तर विधान परिषदेत १.२ टक्के मुस्लीमांचे प्रतिनिधित्व आहे.

Story img Loader