भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवरून शिवसेनेचे नेतृत्व त्यांच्यावर आगपाखड करत असतानाच मनसेला महायुतीसोबत घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय पातळीवरील नेतृत्वच आग्रही असल्याचे उघड झाले आहे. लोकसभा निवडणुकीत २७२चा जादूई आकडा गाठण्यासाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जागा महत्त्वाची असून त्यासाठी बिगरकाँग्रेसी गोटातील सर्वच राजकीय पक्षांना सोबत घ्यावे, अशी भूमिका भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांनी घेतल्याची विश्वसनीय माहिती हाती आली असून त्या दृष्टीने राज ठाकरे यांच्यासोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याचे उघड होत आहे.
‘इंजिना’ला जनसुराज्य, शेकापचा डबा? 
शिवसेना-भाजप ही युती महाराष्ट्रापुरती असली तरी रालोआ ही राष्ट्रीय स्तरावरील आघाडी असून त्यामध्ये वेगवेगळ्या राज्यांतील पक्षांना सोबत घेण्याबाबत भाजपचे केंद्रीय नेते निर्णय घेत असतात. महाराष्ट्रातील रालोआच्या घटक पक्षांबाबतचा विचारदेखील भाजपच्या केंद्रीय स्तरावरून होत असून मनसेची मनधरणी करण्यासाठी केंद्रीय स्तरावरूनच सूचना आल्याचे समजते. राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आपण कोणाचीही परवानगी घेतली नव्हती, असे नितीन गडकरी यांनी म्हटले असले, तरी केंद्रीय नेतृत्वाला या भेटीची पूर्ण कल्पना होती, अशी माहितीही या सूत्रांनी दिली. शिवसेनेसोबतच्या जागावाटपास अंतिम स्वरूप दिल्यानंतरच राज ठाकरे यांच्याशी बोलणी करावीत, त्यामध्ये यश आल्यास जागावाटपाबाबतही भाजपच्या कोटय़ातूनच विचार करता येईल, असाही विचार पक्षाच्या केंद्रीय पातळीवर झाल्याने, राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवसेनेच्या मताची वा परवानगीची गरज नसल्याचा काही नेत्यांचा दावा होता, असे समजते. केंद्रीय पातळीवरच याबाबतचा निर्णय झाल्यामुळे, भाजपच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा करण्याचेही कारण नव्हते, त्यामुळेच या भेटीसाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नव्हती, असे गडकरी यांनी म्हटल्याचा दावा या सूत्रांनी केला.
‘राज’नाटय़ामुळे मनसेतही अस्वस्थता!
महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी जास्तीतजास्त जागा पदरी पडाव्यात यासाठी कोणत्याही स्थितीत संभाव्य मतविभागणी टाळलीच पाहिजे, अशी आग्रही भूमिका अमित शहा यांनी सातत्याने लावून धरली आहे. याला मोदी यांनीही अनुकूलता दर्शविल्याचे समजते. नाशिकमधील गोदा पार्कच्या नूतनीकरण समारंभातील गडकरी यांची उपस्थिती हा या प्रयत्नांचाच पहिला टप्पा होता, असे या सूत्रांनी सांगितले. गडकरी यांच्या राज भेटीनंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मात्र या प्रकरणी पूर्ण मौन पाळले, यावरूनच ही भेट पूर्वनियोजित असल्याचे स्पष्ट होते, असा दावा या सूत्रांनी केला.
गडकरींच्या आधी मुंडेंचीही ‘राज भेट’!
‘इंजिना’ला जनसुराज्य-शेकापचा डबा?
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीची रणनीती मनसेच्या वर्धापनदिनी ९ मार्च रोजी राज ठाकरे जाहीर करणार असले तरी जनसुराज्य पार्टीचे विनय कोरे, शेकापचे जयंत पाटील आणि नाशिकचे शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी गुरुवारी कृष्णभुवन येथे राज यांची भेट घेतल्यामुळे तिसऱ्या आघाडीचे नवे समीकरण आकारास येण्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज ठाकरे तिसऱया आघाडीच्या तयारीत?