राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगू लागला आहे. एकीकडे राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदेगट असा थेट सामना रंगताना दिसत असताना दुसरीकडे मुंबईत भाजपा विरुद्ध शिवसेना राजकारण चालू असल्याचं दिसत आहे. आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्ष मुंबईत आपापली ताकद दाखवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी गेल्या काही दिवसांत शिवसेना आणि विशेषत: आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्याचं धोरण ठेवल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी वातावरण तापू लागलं आहे. आशिष शेलार यांनी ट्वीटरवरू एक खुलं पत्र शेअर करत ‘सामना’ अग्रलेखावरून शिवसेनेवर तोंडसुख घेतलं आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं भाजपाच्या ‘मराठी दांडिया’वर टीकास्र सोडलं आहे. ‘कमळाबाईंचा आता मराठी दांडिया’ अशा शब्दांत भाजपाच्या या उपक्रमाची खिल्ली उडवत भाजपाला लक्ष्य केलं आहे. ‘महापालिकेवरील ‘भगवा झेंडा’ खाली खेचण्यासाठी भाजपच्या कमळाबाई अनेक युक्त्या आणि क्लृप्त्या करीत आहे. एका बाजूला मराठी लोकांत फूट पाडायची तर दुसऱ्या बाजूला शाकाहार, मांसाहार असे विषय घेऊन इतर प्रांतीय, समाजाला वेगळे करायचे असे त्यांचे एकंदरीत धोरण आहे. लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे’, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Amit Shah in shirdi
Amit Shah : “शरद पवारांच्या दगाफटक्याच्या राजकारणाला २० फूट जमिनीत गाडलं”, अमित शाहांचा शिर्डीतून एल्गार; उद्धव ठाकरेंवरही टीका!
santosh deshmukh latest news in marathi
‘‘संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना फाशी द्या”, वाशीममध्ये सर्वपक्षीय मोर्चात मूक आक्रोश
devendra fadnavis sanjay raut
“संजय राऊत रिकामटेकडे…मी नाही”, देवेंद्र फडणवीसांचा टोला
Image of Ajit Pawar
Ajit Pawar : “पक्ष वगैरे न बघता…” धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची मोठी प्रतिक्रिया
What Bajrang Sonawane Said?
Bajrang Sonawane : अजित पवारांच्या पक्षाकडून ऑफर आली का? विचारताच बजरंग सोनावणे म्हणाले, “आम्ही आठही खासदार….”

‘ज्यांना पोटात जळजळ, मळमळ होतेय..’

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या टीकेला आशिष शेलारांनी खुलं पत्र लिहून प्रत्युत्तर दिलं आहे. ‘ज्यांनी राम वर्गणीची खिल्ली उडवली..ज्यांनी अडीच वर्षे मंदिरात देवाला बंदिवान केले, ज्यांनी दहिहंडी, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव बंद करायला लावले त्यांना आता शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर मुंबईत उत्सवाची धूम सुरु आहे ते पाहून पोटात मळमळ होतेय, मुरड मारतेय. म्हणून ते ‘सामना’तून जळजळ व्यक्त करीत आहेत. ज्यांना मराठी माणसाचे उत्सव आणि आनंद बघून मळमळ, जळजळ होतेय, त्यांना आमचा एकच सल्ला ‘मग घ्या ना धौती योग!’ असं म्हणत आशिष शेलारांनी टोला लगावला आहे.

“थापा हा पैशाने विकला जाणारा…” अरविंद सावंतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर

‘करुन दाखवले असे होर्डिंग लावले नाहीत’

‘कोरोना, वादळ, अतिवृष्टी अशा प्रत्येक संकटात भाजपाचे नेते, पदाधिकारी, मंत्री, कार्यकर्ते अडचणीच्या काळात घरात बसून राहिले नाहीत, घरोघरी जाऊन मदत करीत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कार आमच्यावर आहे. त्यामुळे आम्ही कधीच जे केले त्याचे ‘करुन दाखवले’ असे होर्डिंग लावले नाहीत’, असंही या पत्रात म्हटलं आहे.

ashish shelar letter
आशिष शेलार यांनी शेअर केलेली पोस्ट!

‘थापा मारणाऱ्यांकडे ‘थापा’ही उरला नाही’

दरम्यान, बाळासाहेबांची सेवा करणारे चंपासिंग थापा शिवसेनेची साथ सोडून एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यावरूनही आशिष शेलारांनी टोला लगावला आहे. ‘पण आम्ही म्हणजेच उत्सव अशा थापा मारणाऱ्यांकडे आता ‘थापा’पण राहिला नाही आणि उत्सवही. यावेळी आम्ही सण उत्सवाची केवळ मुंबईतील आकडेवारी देऊन गर्वहरण केले. त्यावेळी मात्र जळजळ व्हायला लागली”, असं शेलार या पत्रात म्हणाले आहेत.

विश्लेषण : शिंदे वि. ठाकरे… निवडणूक आयोगापुढील सुनावणीत काय होणार?

‘गिरणगावात म्हणजे लालबाग, परळ, शिवडीमध्ये मराठी दांडिया भाजपाने आयोजित केला त्याचा त्रास ‘सामना’कारांना आणि पेग्विन सेनेला एवढा का झाला? अर्थात याकूबच्या कबरीचे सुशोभीकरण करणाऱ्यांना मराठी दांडियाचा त्रास होणारच”, असंही या पत्रात म्हटलं आहे.

या पत्रानंतर आता शिवसेनेकडून याला काय उत्तर दिलं जातंय, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Story img Loader