मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबाविषयी बोलल्यास आणि एकेरी उल्लेख केल्यास माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आमचे नेतेही अपमान करतील, असा इशारा मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिला आहे. तुम्ही भावाविरोधात न्यायालयात लढलात की नाही, वहिनींबरोबर कौटुंबिक नाते आहे की भांडण, तुम्ही वडिलांची मालमत्ता हडप केल्याचा आरोप सख्ख्या भावाने केला आहे की नाही, चुलत भावाला पक्षाबाहेर काढून तुम्हाला आनंद मिळाला का, असे अनेक प्रश्न शेलार यांनी उपस्थित केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> “विरोधात बसून टोमणे मारण्यापेक्षा…”, संघर्ष यात्रेवरून प्रफुल्ल पटेलांचा रोहित पवारांना टोला

‘आमची माती, आमचा देश’ ही आमची भूमिका असून तुमच्यासारखी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशी आमची भूमिका नसल्याचा टोला शेलार यांनी लगावला आहे. ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात  कुटुंबव्यवस्था न मानणाऱ्यांनी घराणेशाहीवर बोलू नये, अशी टिप्पणी केली होती. ठाकरे यांनी पुन्हा अशा प्रकारे वक्तव्ये केल्यास अपमान सहन करण्याची तयारी ठेवावी, असा इशारा शेलार यांनी दिला आहे.