मुंबई : शिवसेनेची दोन शकले पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मुंबईत आपले बस्तान बसवण्यासाठी जिंकून येणाऱ्या उमेदवारांची जमवाजमव सुरू केली आहे. आतापर्यंत ३५ हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला असल्याचा दावा करण्यात येतो आहे. मात्र वाढत्या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे गटाला धक्का बसण्याबरोबरच भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनाही धक्के बसू लागले आहेत.

पालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी पालिकेच्या निवडणुकीची सुप्तपणे तयारी सुरू आहे. शिंदे यांच्या शिवसेनेत तर महिन्याला चार – पाच माजी नगरसेवकांचे पक्षप्रवेश होत आहेत. आतापर्यंत ३५ हून अधिक माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यात काही नगरसेवक हे २०१७ चे तर काही त्याआधीच्या काळातील माजी नगरसेवक आहेत. ठाकरे गटातील यशवंत जाधव, शीतल म्हात्रे, समाधान सरवणकर, दिलीप लांडे, संतोष खरात, परमेश्वर कदम, आत्माराम चाचे, वैशाली शेवाळे, भारती बावदाने, मानसी दळवी, अमेय घोले, तृष्णा विश्वासराव, किरण लांडगे, चंद्रावती मोरे, सुवर्णा करंजे, प्रवीण शिंदे अशा सुमारे वीस माजी नगरसेवकांचा समावेश आहे. तर पुष्पा कोळी, सुनील मोरे, कुणाल माने, धनश्री भरडकर असे कॉंंग्रेस व राष्ट्रवादीमधील देखील माजी नगरसेवक आहेत. या पक्षप्रवेशांमुळे शिंदे गटाची मुंबईतील ताकद वाढत असली तरी पालिका निवडणुकीच्या वेळी भाजपा आणि शिंदे गटाची युती झाली तर आपल्या वाट्याला जागा येईल का या चिंतेने भाजपाच्या इच्छुक उमेदवारांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. आधीच महापालिका निवडणुकांसाठी पुन्हा एकदा आरक्षणाच्या दिव्यातून जावे लागणार असताना त्यात या पक्षप्रवेशांमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.

Devendra fadnavis meet amit shah
नाराज एकनाथ शिंदेंची भाजपकडून मनधरणी, फडणवीस – शहा चर्चेनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Eknath Shinde
Eknath Shinde : शिंदे गटाची महत्त्वपूर्ण बैठक संपल्यानंतर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
eknath shinde avoid delhi visit
शिंदे यांनी दिल्लीवारी टाळली ?
cm Eknath shinde
शिवसेनेत फिरती मंत्रीपदे; इच्छुक, नाराजांना थोपविण्यासाठी शिंदे यांचा तोडगा
Eknath Shinde is now Deputy CM and second ranked leader in Devendra Fadnavis government
एकनाथ शिंदेंचे सरकारमधील स्थान दुसऱ्या क्रमांकाचे, शिंदेंना ‘देवगिरी’
Only 30 percent of road works were completed during the Eknath Shinde government Mumbai news
‘दोन वर्षांत खड्डेमुक्त मुंबई’चे स्वप्न अधुरेच; शिंदे सरकारच्या काळात रस्त्यांची ३० टक्केच कामे पूर्ण
Despite success in the assembly elections the future is challenging for Eknath Shinde
विधानसभा निवडणुकीतील यशानंतरही एकनाथ शिंदे यांच्यासाठी भविष्यकाळ आव्हानात्मक? दिल्लीतील ‘महाशक्ती’चा पाठिंबा अजूनही? 

हेही वाचा – मुंबई : बिनआवाजी फटाकेही घातक, आवाज फाऊंडेशनच्या अहवालातील वास्तव, महानगरपालिकेच्या धोरणाची प्रतीक्षा

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाने एकूण २२७ जागा लढवल्या होत्या व त्यातून ८२ जागा जिंकल्या होत्या. तर अनेक ठिकाणी भाजपा दुसऱ्या स्थानकावर होता. त्यामुळे या जागांवरही भाजपाच्या उमेदवारांनी लक्ष केंद्रीत केले होते. मात्र जिथे भाजपाला वाढण्यास संधी आहे अशा जागेवरही शिंदे गटाने कॉंंग्रेसचे उमेदवार किंवा ठाकरे गटातील २००७ किंवा २०१२ चे उमेदवार पळवल्यामुळे अशा जागांवरून हळूहळू वाद वाढू लागल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये ऐकायला मिळते आहे.

वरळी विधानसभेत समाधान सरवणकर, संतोष खरात, दत्ता नरवणकर यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला असला तरी हे प्रभाग पारंपरिक शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे तिथे शिंदे शिवसेना आणि भाजपा याच्यात वाद होण्याची शक्यता नसली तरी अमराठी भागांमध्ये जिथे भाजपाला वाढण्यास संधी आहे अशा जागांवर हे वाद होण्याची शक्यता आहे.

पालिका निवडणुकीपूर्वी शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांची युती झाल्यास ज्या जागांवर ज्या पक्षाचा उमेदवार २०१७ मध्ये निवडून आला होता त्याला ती जागा मिळेल असे ढोबळ तत्त्व सध्या तरी पक्षातील वरिष्ठांकडून इच्छुकांना सांगितले जात आहे. मात्र जिथे भाजपाचे नगरसेवक निवडून आले आहेत अशा प्रभागांमध्येही उमेदवार शिंदे गटात आले आहेत. भायखळा मतदारसंघात अखिल भारतीय सेनेच्या वंदना गवळी यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र त्यांच्या प्रभागात आधीच सुरेखा लोखंडे या भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे तिथे युती झाल्यास खटके उडण्याची शक्यता आहे.

वडाळामध्ये भाजपाच्या वाट्याला एकच जागा?

वडाळा विधानसभा मतदारसंघ हा आमदार कालिदास कोळंबकर यांचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या मतदारसंघातील पाचपैकी चार जागांसाठी शिंदे गटात उमेदवार तयार झाले आहेत. त्यात ठाकरे गटातून आलेले अमेय घोले, तृष्णा विश्वासराव आणि कॉंंग्रेसमधून आलेल्या पुष्पा कोळी, सुनील मोरे यांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदारसंघात केवळ भाजपाच्या माजी नगरसेविका नेहल शाह यांची एकमेव जागा लढवायची का असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे.

हेही वाचा – मुंबई : आकाश कंदिलावर जरतारीचा मोर… खण, पैठणी, म्हैसूर सिल्कपासून तयार केलेल्या कंदिलांना मागणी

या जागांवरून वाद होण्याची शक्यता

  • सांताक्रूझमध्ये प्रभाग ९९ मध्ये माजी नगरसेवक संजय अगलदरे आणि २००७ चे माजी नगरसेवक दिलीप चावरे या दोघांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र या प्रभागाच्या आजूबाजूचे प्रभाग हे भाजपाचे आहेत.
  • अंधेरी मरोळ येथे प्रभाग क्रमांक ८६ मध्ये कॉंग्रेसच्या नगरसेविका सुषमा राय आणि पती कमलेश राय यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. या जागेवर भाजपाला गेल्या निवडणुकीत केवळ ९८५ मतांनी हार पत्करावी लागली होती.
  • गोवंडीमध्ये प्रभाग क्रमांक १४४ मध्ये भाजपाच्या अनिता पांचाळ या निवडून आल्या होत्या. या प्रभागात भाजपाच्या बबलू पांचाळ यांचे प्रस्थ आहे. मात्र इथे शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्नी कामिनी शेवाळे यांनी ठाकरे गटातून चांगले आव्हान निर्माण केले होते. अवघ्या ४९१ मतांनी त्या हरल्या होत्या.

२०१७ मध्ये ज्या पक्षाचा उमेदवार जिंकून आला त्या पक्षाचीच ती जागा आहे, ही गोष्ट सुस्पष्ट आहे. चर्चा काहीही असली तरी ही बाब पक्षाच्या पातळीवर स्पष्ट आहे. – आमदार आशिष शेलार, मुंबई प्रदेशाध्यक्ष

ज्या पक्षाचा उमेदवार २०१७ मध्ये जिंकून आला त्याच पक्षाला ती जागा मिळणार हे निश्चित आहे. त्याव्यतिरिक्त उरलेल्या जागांची वाटणी कशी करायची याबाबत नंतर चर्चेच्या वेळी निर्णय होतील. मात्र एखाद्या ठिकाणी आमचा उमेदवार चांगला असेल तर तो युतीमध्ये कमळाच्या चिन्हावरही निवडणूक लढवेल, असाही पर्याय आहे. – खासदार राहुल शेवाळे, शिवसेना

Story img Loader