मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी दुपारी पहिला विस्तार होत असून, यामध्ये भाजप आणि शिवसेनेच्या प्रत्येकी दहा नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी होत असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत दिली होती. पहिल्या विस्तारात शिवसेनेचे दहा नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
विधानभवनाच्या आवारात दुपारी चार वाजता शपथविधी सोहळा होणार आहे. त्यासाठी विधानभवन परिसरात जय्यत तयारीही करण्यात आली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. दरम्यान, या विस्तारात भाजप आणि शिवसेनेचे कोणते नेते मंत्रिपदाची शपथ घेतील, याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात येईल, याचीसुद्धा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपचे कॅबिनेट मंत्री
गिरीश बापट – विधीमंडळ कामकाज आणि अन्न व नागरी पुरवठा
गिरीश महाजन – जलसिंचन
बबनराव लोणीकर – पाणीपुरवठा
राजकुमार बडोले – सामाजिक न्याय
चंद्रशेखर बावनकुळे – ऊर्जा
राज्यमंत्री
राम शिंदे
महाराज अमरिश अत्राम
प्रविण पोटे
रणजित पाटील
विजय देशमुख

शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री
सुभाष देसाई – उद्योग
दिवाकर रावते – वाहतूक
एकनाथ शिंदे – एमएसआरडीसी
रामदास कदम – पर्यावरण
डॉ. दीपक सावंत – आरोग्य
राज्यमंत्री
दीपक केसरकर
रविंद्र वायकर
विजय शिवतारे
राजेश क्षीरसागर
संजय राठोड

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp cabinet expansion probable ministers their portfolios