ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येतो आहे. तर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, यावरून आता राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महत्त्वाचे म्हणजे या घटनेनंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे नेते नेते प्रसाद लाड कोटेचा यांच्या कार्यालयात पोहोचले. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. यादरम्यान भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.

हेही वाचा – महायुतीच्या व्यासपीठावरून राज ठाकरेंच्या पंतप्रधान मोदींकडे पाच मागण्या; म्हणाले “सर्…

यासंदर्भात बोलताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले. “मिहीर कोटेचा यांच्या मुलूंडमधील कार्यालयावर जो हल्ला करण्यात आला, तो भ्याड हल्ला होता. यावेळी महिलांवरही हल्ला केला गेला. छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती महिलांवर हल्ला करणे शिकवत नाही. संजय पाटलांना त्यांचा पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे अशा प्रकाराचा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. असा हल्ला सहन केला जाणार नाही. या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो”, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

दरम्यान, भाजपाच्या या आरोपाला आदित्य ठाकरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. “मिहीर कोटेचा यांचे कार्यकर्ते पैस वाटत होते. त्याचा एक व्हिडीओसु्द्धा बाहेर आला आहे. तिथे पोलिसांना बोलवलं गेलं. मात्र, पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच अटक केली. अशाप्रकारे कारवाई होत असेल तर निवडणूक कशी लढवायची?” असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp camdidate mihir kotecha office in mulund attacked by thackeray group spb