मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे अधिवेशन रविवारी पुण्यात होणार असून त्यास राज्यातील ५३०० कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आदी नेते अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रनिहाय कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. विधानसभा निवडणूक प्रचार आणि तयारीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका प्रतिनिधी, पदाधिकारी आदी सहभागी होणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp convention in pune today mumbai amy
Show comments