महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेले राजकीय वाद आणि त्यातून होणारे आरोप-प्रत्यारोप यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून होणारी वादग्रस्त वक्तव्यं, आरोप यामध्ये काही नवं नाही. मात्र यावेळी टीकेची खालावलेली पातळी ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला गालबोट लावत आहे. पण यादरम्यान राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कृतीमधून पुन्हा एकदा राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे. गोव्यात विमान उपलब्ध नसल्यामुळे अडकलेल्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना फ़डणवीसांनी आपल्या चार्टर्ड विमानात जागा देत लिफ्ट दिल्याने सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

नेमकं काय झालं?

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. प्रचारसभा, पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते जोरदार प्रचार करत आहेत. दरम्यान गोव्यात शिवसेनादेखील मैदानात उतरली आहे. यानिमित्ताने किशोरी पेडणेकर गोव्यात पोहोचल्या होत्या. रविवारी घराघरात जाऊन त्या प्रचार करत होत्या. याचदरम्यान त्यांनी लतादीदींच्या निधनाची माहिती मिळाली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

निधनाची माहिती मिळताच किशोरी पेडणेकर तातडीने मुंबईसाठी निघाल्या होत्या. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसदेखील गोव्यात असून चार्टर्ड विमानाने मुंबईला जात असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी तातडीने फडणवीसांशी संपर्क साधला आणि लिफ्ट देण्याची विनंती केली. महापौर किशोरी पेडणेकरांची ही विनंती फडणवीसांनी मान्यही केली.

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अणि गिरीश महाजन हेदेखील चार्टर प्लेननं मुंबईला आले. आणि त्यांच्यासोबत महापौर किशोरी पेडणेकरही मुंबईपर्यंत पोहोचल्या.

रुपाली ठोंबरेंकडून कौतुक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करत कौतुक केलं आहे. महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे असं त्या म्हणाल्या आहेत. “अचानक लतादीदी यांच्या निधनाची बातमी मिळाली. मुंबईच्या महापौर किशोरीताईंना पणजीतून मुंबईकडे येण्यासाठी सकाळी फ्लाईट नव्हती. यावेळी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस त्यांच्या चार्टर्ड प्लेनने त्यांना गोवा टू मुंबई लिफ्ट दिली. खरंतर महाराष्ट्राची ही राजकीय सुंदरता आपण सर्वांनी टिकवली पाहिजे,” असं त्यांनी म्हटलं आहे.

किशोरी पेडणेकर आणि देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यात असलेला वाद सर्वश्रुत आहे. अनेक मुद्द्यांवरुन त्यांच्यात नेहमी शाब्दिक युद्ध होत असतं. नुकतंच मुंबईतील वाहतूक कोंडीवरुन अमृता फडणवीसांनी केलेल्या टीकेवर किशोरी पेडणेकरांनी टीका केली होती. पण हे सर्व वाद बाजूला ठेवत फडणवीसांनी किशोरी पेडणेकरांना केलेल्या मदतीबद्दल कौतुक होत आहे.

Story img Loader