राज्यात सध्या चर्चा सुरू आहे ती सर्वोच्च न्यायालयात नाकारल्या गेलेल्या मराठा आरक्षणाची. राज्य सरकारने केलेला मराठा आरक्षण कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. एकीकडे सत्ताधाऱ्यांकडून अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर निशाणा साधला असताना आता देवेंद्र फडणवीसांनी या आरोपांचा पखड शब्दांमध्ये समाचार घेतला आहे. “आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम आत्ताच्या सरकारने केलं आहे. अर्धवट बोलायचं आणि खोटं बोलायचं हे अशोक चव्हाण आणि नवाब मलिक यांनी केलं आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना विश्वासात घेऊन हा कायदा तयार केला गेला होता. हा कायदा केला तेव्हा सर्व पक्षांनी एकत्रपणे या कायद्याला समर्थन दिलं. एकमताने मान्य केला. त्यामुळे अशोक चव्हाणांना तेव्हा तो कायदा मान्य होता आणि आज ते म्हणत आहेत की राज्याला कायदा करण्याचा अधिकार नव्हता”, असं फडणवीस म्हणाले आहेत.
“आरक्षणाचा मुडदा पाडण्याचं काम सरकारने केलं”, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर परखड टीका!
मराठा आरक्षणावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-05-2021 at 14:51 IST
TOPICSमराठाMarathaमराठा आरक्षणMaratha Reservationमराठा समाजMaratha Communityमराठी क्रांती मोर्चाMaratha Kranti Morcha
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp devendra fadnavis on maratha reservation cancelled in supreme court blames maharashtra government pmw