राज्यातील पाटबंधारे विकास महामंडळातील आणि जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराची सीबीआयकडून फौजदारी चौकशी करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांविरुध्द यासंदर्भात विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याबाबतही विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे भाजपने जोरदार लावून धरल्याने र्सवकष चौकशी करण्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात जाहीर केले होते. त्यानुसार डॉ. माधवराव चितळे यांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. तावडे यांना काही कागदपत्रे व पुरावे समितीसमोर सादर करायचे होते. पण आरोपांची चौकशी करण्याचा अधिकार कार्यकक्षेत नसल्याचे चितळे यांनी तावडे यांच्याकडे स्पष्ट केले. त्यामुळे आता उच्च न्यायालयातील याचिकांमध्ये सहभागी होऊन सीबीआय चौकशीची मागणी न्यायालयाकडेच केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Mar 2013 रोजी प्रकाशित
जलसंपदा भ्रष्टाचाराच्या सीबीआय चौकशीसाठी भाजप न्यायालयात जाणार
राज्यातील पाटबंधारे विकास महामंडळातील आणि जलसंपदा विभागातील भ्रष्टाचाराची सीबीआयकडून फौजदारी चौकशी करण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी बुधवारी सांगितले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 09-03-2013 at 02:49 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp file pil for cbi enquiry on maharashtra irrigation scam